Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करतात. काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. या तरुणींचा स्वॅग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. नऊवारी नेसून या तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहे.
नऊवारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लग्न असो किंवा कोणताही शुभ कार्यक्रम मराठी महिला आवडीने नऊवारी नेसतात. नऊवारीवर मराठमोळा साज श्रृंगार करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा या तरुणी मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला सहा तरुणी दिसेल. या सर्व तरुणींनी सुंदर नऊवारी साड्या नेसल्या आहेत. या सहा तरुणीच्या साड्या वेगवेगळ्या आहेत. त्या या नऊवारी साड्यांमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्यांनी डोळ्यावर चष्मा घातला आहे आणि नाकात नथ घातली आहे. मराठमोळा साज श्रृंगार त्यांना केला आहे. मराठी पोरींचा स्वॅग पाहून तुम्हीही भारावून जाल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्या “नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी” या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्या मनसोक्तपणे डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
a girl cleaning shaved by sitting in salon
अरे देवा! सलुनमध्ये बसून चक्क दाढी करत होती तरुणी, VIDEO पाहून तुम्हीही चक्रावून जाल
Orangutang visits the house viral video
Video : ओरँगउटांगने घरात शिरून आधी हात धुतले, नंतर… माकडाच्या ‘या’ करमातींनी व्हाल चकित
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

shivani_divkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा मराठी पोरी एकत्र येतात..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स केला आहे. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी सुंदर परिसर पाहून लोकेशन विचारले आहे.