Viral video: महाराष्ट्रात मराठी भाषेवरील वाद सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत.गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेऊन राज्य सरकारने पहिलीपासून मराठी भाषा शिकण्यासंदर्भात आदेश जारी केला. पण या निर्णयाला सामाजिक व राजकीय वर्तुळातून झालेला विरोध लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातले अध्यादेश रद्द केल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा विषय चर्चेत असतानाच उत्तर प्रदेशातून एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये एका मराठी भाषिकाला मराठी नाही इथ भोजपूरी बोलायचं नाहीतर नोकरी जाईल असं सांगून धमकावण्यात आलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओवर संताप व्यक्त केला जातोय.
उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक घटनेत, एका स्थानिक दुकानात काम करणाऱ्या मराठी भाषिक सेल्समनवर भोजपुरीमध्ये बोलण्यासाठी दबाव आणण्यात आला आहे. अन्यथा त्याची नोकरी गमावण्याची धमकीही त्याला दिली आहे. “मराठी बोलणे से काम नहीं चलेगा” – असे त्याला सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ग्राहक सेल्समॅनला ओरडताना दिसत आहे, हे महाराष्ट्र नाही महाराष्ट्रात जाऊन मराठी बोल, इकडे भोजपुरीच बोलायचं असं म्हणत ग्राहक धमकवताना दिसत आहे.
महाराष्ट्रातून कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या या माणसाने म्हटले आहे की, त्याला त्याची मातृभाषा सोडण्यास भाग पाडले जात आहे, दुकानात मराठी बोलल्याबद्दल द्वेष सहन करावा लागत आहे. हे फक्त भाषेबद्दल नाही – ते आदराबद्दल आहे, ओळखीच्या अधिकाराबद्दल आहे. भारतासारख्या देशात जिथे विविध भाषा आपल्या लोकशाहीचा गाभा आहेत. यावेळी एखाद्याला प्रादेशिक बोली बोलण्यास भाग पाडणे त्या भावनेचे उल्लंघन असल्याचं त्यानं म्हंटलंय. भाषेने आपल्याला जोडावे, आपल्याला विभाजित करू नये. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ indiainlast24hr नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक संताप व्यक्त करत आहेत. काहींही टीका केलीय तर काहींनी महाराष्ट्रात जसं वागतात तसंच वागला अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.