Marathi vs Hindi: राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्यातील १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यतील राजकीय क्षेत्रातून विरोध केला जात आहे. मात्र, राज्यभरातील लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही सक्ती मागे घेण्यात आली. अशातच राज्यात हिंदी सक्तीचा वाद सुरू असताना एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामध्ये तिची आई तिच्याशी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत असताना या चिमुकलीनं आईला असं उत्तर दिलं की सर्वच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या चिमुकलीचा अभिमान वाटेल.

सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीची चर्चा असून हीच नाव ओवी त्रुतुजा विशाल सावंत आहे. ही नालासोपारा येथे राहत असून एवढ्याशा वयात आपल्या भाषेबद्दल तिला असलेली ओढ पाहून सर्वच थक्क झाले आहेत.

या व्हिडीओमध्ये एक चिमुकली मुलगी आपल्या आईला मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगताना दिसते. आई इंग्रजी शब्द वापरते, पण ही चिमुकली त्या इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय काय आहेत, ते स्पष्ट करते.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई मुलीला विचारते “जेवण टेस्टी आहे का?” यावर मुलगी उत्तर देते, “टेस्टी बोलायचं नाही. मराठीत टेस्टी हा शब्द येत नाही. ‘छान’ बोलायचं. ‘जेवण छान आहे’ असं म्हणायचं.”

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर vinu_tambitkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटंलय, “मराठी भाषेबद्दल आदर आहे लहान वयात येवढी समज आहे (आपल्या घरातील स़ंस्कार- बाळकडू )”

“खरंच असाच आपल्या मात्रु भाषेबद्दल प्रत्येकाला अभिमान असायला हवा”

“अशी मूल अशीच जन्माला येत नाहीत त्यांना तसे संस्कार द्यावे लागतात.”

“आपण आपल्या भाषेवर ठाम राहिल तर जगही त्याची दखल घेतच.”

“त्या चिमुकलीला समजल मराठी भाषा जपली पाहिजे ते परंतु आपल्या मोठ्या माणसांना अजूनही समजले नाही.”

“या पिढीमुळे कुठेतरी आशेचा किरण दिसून येतोय.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खरोखर मराठी असल्याचा अभिमान वाटतो.”