Viral video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने मराठी विरुद्ध अमराठी हा वाद सातत्याने रंगताना दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात घडला. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये मराठी भाषिक हे अमराठी भाषिकाला मराठी बोलण्यास भाग पाडत आहे. एका छोट्या फरसाण दुकानात एका ग्राहकाने एका कामगाराला मराठी बोलण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही घटना रविवारी दुपारी मुंबईतील घाटकोपर भागात घडली.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ग्राहकाने कामगाराला धमकी दिली की उद्यापासून मराठी न बोलल्यास दुकान बंद करू. कामगाराने उत्तर दिले, “एक दो दिन में मराठी थोडी आती है साहाब,” म्हणजेच. “एक-दोन दिवसांत मराठी कशी शिकता येईल?” त्यानंतर तो माणूस कामगाराला मारहाण करण्याची धमकी देतो. “इतना मरेगा ना अभी,” तो म्हणाला. तेव्हा कार्यकर्ता म्हणाला, “बात सही है, लेकी एक-दो दिन में आदमी नहीं खोज पायेगा, अभी समय लगेगा.” त्यानंतर त्या माणसाने कामगाराला इशारा दिला की तो मराठी शिकला आहे की नाही हे तपासण्यासाठी तो पंधरा दिवसांत परत येईल.तसेच त्याने कामगाराला त्याच्या बॉसला कळवण्यास सांगितले. संपूर्ण व्हिडीओमध्ये कामगार नम्रपणे उत्तर देतो, तो स्पष्ट करतो की काही दिवसांत नवीन भाषा शिकणे थोडं अवघड आहे.
पाहा व्हिडीओ
काही दिवसांपूर्वीही एका ग्राहक आणि डोमिनोज डिलिव्हरी बॉयमध्ये वाद झाला होता. यावेळी डिलिव्हरी बॉयने नंतर मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहकाची माफी मागितली. मे महिन्यातच, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीम स्टॉलवर मराठी बोलण्यावरून एका पुरूष आणि एका तरुणीमध्ये झालेल्या जोरदार वादाचा व्हिडिओ समोर आला होता.
एकीकडे भारत दहशतवादाविरुद्ध लढत आहे, तर दुसरीकडे अंतर्गत लोक जात, धर्म आणि भाषेचे मुद्दे बनवून आपापसात लढत आहेत. अशीच एक घटना मुंबईतून समोर आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.