पंजाबी लोक अगदी कुठेही भांगडा करू शकतात असे मस्करीत म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर याचाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारीटाईम भांगडा ग्रुपने सोशल मीडियावर एका व्हिडिओ टाकला आहे ज्यात ३ पंजाबी तरूण गोठवणा-या थंडीत भांगडा करत आहेत.

वाचा :  मोदींवरचा विश्वास नडला अन् नोटा भरायला उशीर झाला

कॅनडामधला प्रसिद्ध भांगडा ग्रुप मारीटाईम भांगडाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यातले तीन प्रसिद्ध डान्सर रस्त्यावरचा बर्फ साफ करत भांगडा करताना दिसत आहे. हा भांगडा ग्रुप कॅनडात चांगलाच प्रसिद्ध आहे. युट्युबवर याच नावाने त्यांचा ग्रुपही आहे. ज्यात आतापर्यंत त्याने अनेक व्हिडिओ अपलोड केले आहे. एखादे इंग्रजी गाणे घेऊन त्यावर भांगडा करणे या ग्रुपची खासियत आहे. त्यामुळे देशीच काय पण या ग्रुपचे विदेशी फॉलोवर्सही अधिक आहे. ब-याच दिवसानंतर या ग्रुपने नवा व्हिडिओ आणला आहे आणि नेहमीप्रमाणे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत युट्युबवर साडेसहा लाखांहूनही अधिक जणांनी तो पाहिला आहे.