प्रत्येकाला आपले लग्न खास आणि कायम आठवणीत बनवायचे असते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे मार्गही अवलंबतात. विशेषतः लग्नपत्रिकेत लोक खूप सर्जनशीलता दाखवण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना कार्डवर एक अनोखा संदेश लिहिलेला दिसतो, तर काही लोक लग्नपत्रिका खूप सजवतात, जेणेकरून पत्रिका वेगळी आणि खास दिसावी. अलीकडेच, सोशल मीडियावर अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांचे फोटो असलेली समाजवादी पार्टीच्या रंगात छापलेली यूपीची लग्नपत्रिका आणि मदुराईतील एका जोडप्याचे लग्नपत्रिका ज्यावर त्यांनी QR कोड छापला होता, ते व्हायरल झाले होते. अशाच काही मनोरंजक लग्नपत्रिका सोशल मीडियावर अनेकदा दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजून एक हटके पत्रिका

गुवाहाटी, आसाम येथील एका वकिलाच्या लग्नपत्रिकेचाही अशाच काही लग्नपत्रिकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या जोडप्याने त्यांच्या खास दिवसासाठी संविधान-थीम असलेली लग्नपत्रिका छापली आहे. कार्डमध्ये समानता दर्शवण्यासाठी वधू आणि वरांची नावे न्यायाच्या तराजूच्या दोन्ही बाजूला लिहिली गेली आहेत. लग्नाच्या आमंत्रणात भारतीय विवाहांना नियंत्रित करणारे कायदे आणि अधिकार यांचाही उल्लेख आहे.

( हे ही वाचा: बाबा ७५ लाखांचा हुंडा नको, त्यापेक्षा मुलींसाठी वसतीगृह बांधा; वडिलांनी पूर्ण केली मुलीची इच्छा )

पत्रिका व्हायरल

संविधानावर आधारित लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. काहींनी आमंत्रण वाचून CLAT अभ्यासक्रमाचा अर्धा भाग पूर्ण केल्याचे गमतीने सांगितले, तर काहींना वाटले की या जोडप्याचे लग्न न्यायालयीन थीमवर असेल. एका यूजरने म्हटले की, ‘हे न्यायालयाच्या समन्ससारखे आहे. दुसरा म्हणाला, “तो माणूस अजूनही त्याच्या नावावर ‘वकील’ लावायला चुकला आहे.”

( हे ही वाचा: Video : मुलीने वाढदिवसादिवशी ट्रॅक्टरवर मारली एन्ट्री, आनंद महिंद्रा म्हणाले विदेशातही आमच्याच ब्रँडचा जलवा )

तिसरा वापरकर्ता गंमतीने म्हणाला, “हे आमंत्रण वाचून अर्धा CLAT अभ्यासक्रम कव्हर झाला आहे.” कोणीतरी सुचवले, “पंडितांच्या जागी न्यायाधीश बसवा.” त्याच वेळी, अजून एका वापरकर्त्याने लिहिले, “सजावटबद्दल विचार करत आहे… कोर्ट थीम.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage act and article of the constitution written on the marriage card itself lawyers wedding card goes viral ttg
First published on: 26-11-2021 at 12:27 IST