आजपर्यंत तुम्ही लग्नसमारंभात नवरा- नवरीवर नोटा किंवा नाणी उधळताना पाहिलं असेल, पण तुम्ही कधी कोणाच्या लग्नात नवरीवर चक्क सोन्याची नाणी उडवताना पाहिले आहे का? जर तुम्ही असे कधी पाहिले नसेल तर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहाच. कारण यात एका लग्नसमारंभात नवरीवर चक्क सोन्याची नाणी उधळली जात असल्याचे दिसत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.

नवरीवर उडवली चक्क सोन्याची नाणी

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसमारंभादरम्यान एक पुरुष आणि एक महिला मध्यभागी उभ्या असलेल्या वधूवर सोन्याची नाणी उडवत आहेत. या दोघांना सोन्याची नाणी उडवताना पाहून असे वाटते की, जणू काही कोणती स्पर्धा सुरू आहे. एका बाजूने ती महिला वधूवर सोन्याची नाणी उडवतोय, तर दुसरीकडे पुरुष तिला कडवी टक्कर देत आहे. तर मध्यभागी उभी असलेली वधू या क्षणाचा हसत आनंद घेत आहे. यावेळी लग्नात सूट आणि बूट घालून आलेले पाहुणे खाली पडलेली सोन्याची नाणी गोळा करताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ भारतातील नाही तर परदेशातील आहे.

pitbull dogs attack delivery man in raipur
“वाचवा मला!” पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; चाव्यांनी हात-पाय केले रक्तबंबाळ; थरारक video व्हायरल
young woman taking a puppy into a flood
‘मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ…’ व्हिडीओ बनवण्यासाठी तरुणीने श्वानाच्या पिल्लाला पुराच्या पाण्यात नेलं VIDEO पाहून युजर्स संतापले
Man Sexually Assault Dogs
रस्त्यात श्वानांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावणाऱ्या विकृताचा Video व्हायरल; लहान मुलगी अत्याचार पाहून थांबवायला गेली पण..
struggle makes us stronger a child doing struggle to sell raincoats in the pouring rain video will bring tears in your eyes
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो! भर पावसात रेनकोट विकण्यासाठी चिमुकल्याची धडपड पाहून डोळ्यात पाणी येईल, VIDEO Viral
Theft of gold by tricking a jeweler on Gupte Road in Dombivli
डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
Assam Floods Man risks life to rescue calf from drowning
Assam Floods : वासराला वाचवण्यासाठी व्यक्तीने थेट पुराच्या पाण्यात मारली उडी, Viral Videoमध्ये थरारक दृश्य कैद
how to save in water
वाहत्या पाण्यात समूहाने अडकलात तर स्वतःसह इतरांचा जीव कसा वाचवाल? भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर प्रशिक्षण देणारा VIDEO व्हायरल!

@ahmad_studio_hfd_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या लग्नसोहळ्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी ही कृती चुकीची असल्याचे म्हटले आहे तर काहांनी इतका दिखावा का केला, असा सवाल केला आहे. जगात जास्त लोक भुकेने मरत आहेत पण इथे सोन्याची नाणी उडवली जात आहेत. त्याचवेळी काही लोक म्हणाले की, नाणी गोळा करणारे पण त्यांचेच लोक आहेत. आता सर्व नाणी गोळा करुन नवरीला भेट म्हणून दिली जातील, अशाप्रकारे अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.