Marriage Wishlist Viral: प्रत्येकाला आयुष्यात जोडीदार हवा असतो. पूर्वी घरातील मंडळींनी निवडलेल्या जोडीदाराबरोबरच लग्न लावून दिले जायचे. मात्र, हल्लीची पिढी स्वत:चा जोडीदार स्वत: शोधतात. त्यासाठी वेगवेगळ्या विवाह संस्थांमध्ये नावनोंदणी करतात. काही जण मॅट्रिमोनियल साइट्सची मदत घेतात. सध्या सोशल मीडियावर मॅट्रिमोनियल साइटवरील एका घटस्फोटित महिलेचा असाच एक बायोडेटा व्हायरल होत आहे. त्यामध्ये या महिलेने होणाऱ्या पतीसाठी इतक्या अपेक्षा ठेवल्या आहेत की, ते वाचून तुम्हालाही चक्कर येईल.

बायोडेटा व्हायरल होत असलेल्या या महिलेचा घटस्फोट झाला असून, ती नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. ही महिला स्वत: महिन्याला ११ हजार रुपये पगार घेते; पण तिला असा नवरा हवा आहे की, जो दरमहा अडीच लाख रुपये कमावणारा असावा आणि जर तो एनआरआय असेल, तर त्याचा पगार ९६ हजार डॉलर्स इतका असावा. त्याशिवाय या घटस्फोटित महिलेला दुसऱ्या लग्नासाठी अविवाहितच मुलगा हवा आहे.

ट्रेनच्या दरवाजाला लटकून करत होती व्हिडीओ शूटिंग, अचानक आला विजेचा खांब अन् …;Video मध्ये पुढे जे घडलं ते फार भयंकर

महिलेचे इतर छंददेखील घ्या जाणून

या पोस्टमध्ये महिलेने सांगितले आहे की, ती तिच्या आई-वडिलांना सोडून राहू शकत नाही, त्यामुळे ती ज्या तरुणाशी लग्न करील, तो त्याच्या कुटुंबाबरोबर नाही, तर एकटाच राहणारा असला पाहिजे. इतकेच नाही, तर ती ज्याच्याबरोबर लग्न करेल त्या मुलाकडे 3+ bhk फ्लॅट असावा. तसेच घरात स्वयंपाक आणि साफसफाईला वेळ मिळणार नसल्याने घरात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी मोलकरीण असावी. त्याशिवाय महिलेला खाण्याची आणि प्रवासाची आवड आहे. त्यामुळे होणाऱ्या नवऱ्याने तिला जगभर फिरवून आणावे, अशी तिची इच्छा आहे. याशिवायही तिने लग्नासाठी तयार केलेल्या बायोडेटामध्ये अनेक अशा अपेक्षा व्यक्त केल्यात की, ज्या वाचूनही तुम्ही शॉक व्हाल. तिने नेमक्या काय इच्छा व्यक्त केल्यात त्या वाचा खालच्या पोस्टमध्ये.

“अशाने ही भविष्यात एकटीच राहील” -युजर्सच्या मजेशीर कमेंट्स

घटस्फोटित महिलेल्या लग्नासाठीचा हा खतरनाक बायोडेटा @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोकांनीही मजेशीर अशा कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ती भविष्यातही एकटीच राहील, असे दिसते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, ती एक लाख ३२ हजार रुपये कमवते आणि फाइव्ह स्टार हॉटेल्सची स्वप्न पाहतेय. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, मुलगा म्हणत असेल, हलवा आहे का? चौथ्या युजरने लिहिलेय की, तिच्या अपेक्षा जरा खूप जास्तच आहेत. शेवटी एका युजरने मिश्कीलपणे प्रश्न विचारला की, लोकांमध्ये इतका आत्मविश्वास येतो तरी कुठून?