scorecardresearch

सात राज्यातील १४ मुलींशी केले लग्न, नंतर पैसे घेऊन झाला फरार; पोलिसांनी ‘असा’ केला पर्दाफाश

या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत.

wedding
या व्यक्तीने कथित पत्नींना सोडण्यापूर्वी या महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. (प्रातिनिधिक फोटो)

मागील ४८ वर्षांपासून सात राज्यांतील १४ महिलांसोबत लग्न करणाऱ्या एका इसमाला भुवनेश्वर येथे अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील पाटकुरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने कथित पत्नींना सोडण्यापूर्वी या महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. मात्र, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितले की, या आरोपीने १९८२ मध्ये पहिले आणि २००२ मध्ये दुसरे लग्न केले होते आणि या दोन्ही लग्नातून त्यांना पाच मुले आहेत.

दास यांनी सांगितले, २००२ ते २०२० पर्यंत त्याने मेट्रोमोनी साईट्सच्या माध्यमातून इतर महिलांसोबत मैत्री केली. तथापि, पहिल्या पत्नीला न सांगताच त्याने या महिलांसोबत लग्न केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो दिल्ली विद्यालयात अध्यापिका असलेल्या आपल्या शेवटच्या पत्नीसोबत ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे राहत होता. या महिलेला त्याच्या मागील लग्नांची माहिती मिळाली आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

रेल्वे स्टेशनला भारतीय भाषेत काय म्हणतात माहित आहे का? जाणून घ्या मजेशीर नाव

त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या भाड्याच्या घरातून अटक केली. दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यमवयीन अविवाहित महिलांना, विशेषत: घटस्फोटितांना, ज्या विवाहविषयक वेबसाइटवर जोडीदाराच्या शोधात आहेत अशांना लक्ष्य करायचा. त्या महिलेला सोडण्यापूर्वी तिच्याकडून पैसे घ्यायचा. पोलिसांनी या आरोपीकडून ११ एटीएम कार्ड, चार आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Married to 14 women from seven states then absconded with money pvp

ताज्या बातम्या