May 13 Special: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलतो. याचा परिणाम १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो. बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यापार, तर्कशक्ती आणि मज्जासंस्थेचा नैसर्गिक कारक मानलं जातं. त्यामुळे बुधाच्या स्थितीत होणारा बदल १२ राशींवरच नाही तर जागतिक स्तरावरही परिणाम करू शकतो.

सध्या बुध मेष राशीत आणि भरणी नक्षत्रात आहे. १३ मे रोजी बुध नक्षत्र बदलून कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मेष राशीत आधीपासूनच सूर्य उच्च स्थितीत असल्यामुळे बुध आणि सूर्याच्या युतीमुळे शक्तिशाली बुधादित्य योग तयार झाला आहे. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आलं आहे. चला जाणून घेऊया, बुध कृत्तिका नक्षत्रात गेल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार १३ मे रोजी सकाळी ११:४७ वाजता बुध कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल आणि १९ मेपर्यंत तिथेच राहील. त्यानंतर तो रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल. तसेच १५ मे रोजी बुध मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करेल.

आकाशातील २७ नक्षत्रांपैकी कृत्तिका हे तिसरं नक्षत्र आहे आणि त्याचा स्वामी सूर्य आहे. हे नक्षत्र अग्नी आणि ऊर्जेशी संबंधित मानलं जातं. त्यामुळे बुधाच्या स्थितीत होणाऱ्या बदलामुळे तेज, क्रिएटिविटी आणि नेतृत्व क्षमतेवर परिणाम दिसून येऊ शकतो. कृत्तिका नक्षत्राच्या पहिल्या चरणाची रास मेष आहे, तर उर्वरित तीन चरणांची रास वृषभ आहे.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचं कृत्तिका नक्षत्रात जाणं अनेक बाबतीत खास ठरू शकतं. या काळात तुमच्या गोचर कुंडलीतील लग्न आणि दुसऱ्या भावात बुध राहणार आहे. त्यामुळे नोकरीच्या क्षेत्रात अनेक फायदे मिळू शकतात. तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढू शकतं.

तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढल्यामुळे लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होऊ शकतात. व्यवसायात नवीन संधी आणि प्रोजेक्ट मिळू शकतात. त्यामुळे चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

जे लोक व्यवसाय करतात, ते त्यांच्या नवीन योजना आणि रणनीतीमुळे मोठं यश मिळवू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरू शकतो. नेतृत्व करण्याची क्षमता वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा गोचर खूप शुभ मानला जातो, कारण एकाग्रता, स्मरणशक्ती आणि अभ्यासाची क्षमता वाढू शकते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचं कृत्तिका नक्षत्रात जाणं खूप लाभदायक ठरू शकतं. या राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर राहू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा दिसू शकते.

नोकरी करणाऱ्यांना बदली, प्रमोशन किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्यही मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. विशेषतः आयात-निर्यात क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा गोचर भाग्यवृद्धी करणारा मानला जातो. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात आणि आयुष्यात स्थिरता येऊ शकते. जीवनात सुख-शांतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. या राशीच्या सप्तम आणि अष्टम भावात बुध राहणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रांतून शुभ बातम्या मिळू शकतात.

कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. प्रमोशनचेही योग तयार होत आहेत. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. भागीदारीत सुरू असलेल्या व्यवसायातूनही लाभ मिळू शकतो.

वैवाहिक आयुष्यात हा काळ गोडवा आणि समज वाढवणारा ठरेल. जोडीदारासोबत संवाद अधिक मजबूत होईल आणि तुम्ही दोघं मिळून भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)