वाहनांसोबत स्टंटबाजी करण्याची क्रेज आजकाल जास्तच वाढत चालली आहे. मात्र, या स्टंटबाजीच्या नादात अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. यात अनेकांचा जीव गेल्याच्या घटनाही समोर येतात. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तर नेटकऱ्यांनीही दुख: व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही स्टंट फसलेले दिसतात तर काही थक्क करून जातात. मात्र, तरीही लोक यातून धडा घेत नाहीत. आता अशीच एक घटना मेरठमधून समोर आली आहे. एक आश्चर्यचकित करणारा स्टंट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट पाहिले असतील. मात्र मेरठमध्ये एका ट्रॅक्टर कंपनीने ट्रॅक्टरचा डमो दाखवताना स्टंटबाजी केली आणि हीच स्टंटबाजी आता मृत्यूचं कारण ठरली.
मेरठ येथील किठौर गावात हा भयानक अपघात घडला असून स्टंट करतांना एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताचा हा भीषण व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान ट्रॅक्टरवर स्टंट करतांना ट्रॅक्टर अचानक पलटला आणि अपघात घडला. ट्रॅक्टरचा डेमो प्रचारादरम्यान हा अपघात झाला आहे. किठोरेच्या कायस्थ बड्डा गावातला हा व्हिडीओ असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, तर नेटकऱ्यांनीही दुख: व्यक्त केलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – हंबरून वासराले चाटती जवा गाय! स्वत: उन्हात उभी राहून वासराला देतेय सावली, हृदयस्पर्शी Video व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संमीश्र प्रतिक्रिया यावर देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत.