व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरेजेच असून ही आजकालची तरुणाई त्याकडे दूर्लक्ष करते. व्यायाम सोडा पण साधी सायकल चालवताना ही कोणी दिसत नाही. जवळच्या अंतरावर जायचं असलं तरी पायी किंवा सायकल वापरण्याऐवजी प्रत्येकजण दुचाकी वापरताना दिसतात. आजकालच्या आळशी तरुणाईला लाजवेल असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक वयस्कर महिला सायकल चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनेकांना प्रेरणा देत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की येईल. सायकल चालवणाऱ्या आजीबाईंचा Video चर्चेत व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर vilassnake नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर सायकल चालवणाऱ्या आजीची विचारपूस करताना दिसत आहे. सुरुवातीला आजीला वय विचारतो. त्यावर आजी आधारकार्डवर नोंदवलले वय ५५ वर्ष असल्याचे सांगते, त्यानंतर तुम्ही रोज सायकल चालवता का असा प्रश्न विचारतो त्यावर आजीबाई सांगतात की हो मी रोज कामाला जाताना सायकल चालवते सांगतात. आजीचे वय ५५ पेक्षा जास्त वाटत असल्याचा दावा अनेक नेटकऱयांनी केला. वय झालं असूनही आजी रोज सायकल चालवत आहे याचे सर्वांनी कौतूक केले. हेही वाचा - “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती!”, वयाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी असलेल्या मावशींनी सादर केली अफलातून लावणी, Video चर्चेत येथे पाहा व्हिडीओ हेही वाचा - भरधाव वेगाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून धावत होता ट्रक…पुढच्याक्षणी जे झाले ते पाहून उडेल थपकाप, Video Viral नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतूक व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले , "खूप छान आजी, आजी ६५ वर्षांच्या असतील" दुसरा म्हणाला, 'आजीला सॅल्युट, खूपचं सुंदर आजी," तिसरा म्हणाला की, "आजीला मानलं पाहिजे, आजी नमस्कार" चौथा म्हणाला, "महाराष्ट्राच्या तरुणांना लाजवणारी गोष्ट आहे" पाचव्याने लिहिले की,"खुप छान आजी या वयात कामाला जाता ते सुद्धा सायकल चालवत हा खुप मोठा आनंदाचा क्षण आहे" हेही वाचा - “ही खरी महाराष्ट्राची संस्कृती!”, वयाची पर्वा न करता स्वच्छता कर्मचारी असलेल्या मावशींनी सादर केली अफलातून लावणी, Video चर्चेत आजींबाईंकडून घ्या सर्वांनी प्रेरणा आजीबाईंचा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. नियमित व्यायाम करणे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाने थोडा वेळ स्वतःसाठी काढावा आणि व्यायाम करावा हाच संदेश या आजीबाई सर्वांना देत आहेत.