Melania Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून २० जानेवारीला शपथ घेतली. त्यानंतर संपूर्ण जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे. अमेरिकेत प्रचंड थंडी असल्याने हा सोहळा अनेक वर्षांनी पहिल्यांदाच अमेरिकेतल्या संसदेत पार पडला. या सोहळ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांचे कुटुंबीयही आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या खास लूकने लक्ष वेधून घेतलं.

मेलानिया ट्रम्प यांनी परिधान केला होता खास ड्रेस

पती डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या मेलेनिया ट्रम्प यांनी न्यूयॉर्कहून डिझाईन करण्यात आलेला खास ड्रेस परिधान केला होता. मेलानिया यांचा हा खास ड्रेस रॉल्फ लॉरेन यांनी डिझाईन केला होता. तसंच या खास ड्रेसवर मेलेनिया यांनी बोलेरो जॅकेट घातलं होतं. तसंच खास प्रकारचे हातमोजेही घातले होते. या खास लूकमध्ये मेलानिया ट्रम्प खूपच आकर्षक आणि मोहक दिसत होत्या.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
U S President Donald Trump
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, सीएफपीबीचे संचालक रोहित चोप्रा यांना पदावरून हटवलं
Donald Trump
ISIS च्या तळांवर अमेरिकेचं एअर स्ट्राइक, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ट्रम्प यांची पोस्ट, “आता तुमच्यापैकी प्रत्येकाला….”
Kash Patel DOnald Trump
“जय श्री कृष्ण” म्हणत FBI च्या नव्या संचालकांचं सीनेट बैठकीत भाषण; आई-वडिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कृतीने वेधलं लक्ष
Loksatta viva Fashion and Statement Influencers Presidential Inauguration
फॅशन आणि ‘स्टेटमेंट’
Image Of Doanald Trump.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णयांचा धडाका सुरूच, अमेरिकेत १९ वर्षांच्या आधी लिंगबदलास घातली बंदी
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?

मेलानिया ट्रम्प यांच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी हा खास ड्रेस परिधान केला होता. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. हा लूक पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी एक खास हॅटही घातली होती. विमन्स वेअर डेलीच्या वृत्तानुसार मेलानिया ट्रम्प यांची ही हॅट एरिक जेविट्सने डिझाईन केली आहे. तर त्यांचा ड्रेस हा अॅडम लिप्सने डिझाईन केला आहे. सोशल मीडियावर मेलानिया ट्रम्प यांच्या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती.

नेटकरी काय काय म्हणत होते?

सोशल मीडियावर लोक म्हणत होते की जर तुम्हाला वाटत असेल मेलानिया ट्रम्प अमेरिकेची सर्वात सुंदर फर्स्ट लेडी आहे तर हात वर करा. एकाने लिहिलं की मेलानिया ट्रम्प या ड्रेसमध्ये एकदम छान दिसत आहेत. त्या खरोखरच खूप सुंदर आहेत.

मान्यवरांची मांदियाळी

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि जेडी वेन्स यांना उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि एलॉन मस्क यांची खास उपस्थिती होती.

पुतिन यांनीही दिल्या शुभेच्छा

शपथविधी सोहळ्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही शुभेच्छा दिल्या. युक्रेन, तसंच अण्वस्त्रांबाबत नव्या अमेरिकेन सरकारशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

Story img Loader