Mercedes Benz CEO s auto ride in Pune: तुम्ही जगातील सर्वात आलिशान कार कंपन्यांपैकी एखाद्या कंपनीमधील उच्चपदस्थ अधिकारी असलात तरी पुण्यात आल्यावर तुम्हाला गरजेच्यावेळी एखादी रिक्षाच मदत करु शकते. त्यात तुमची गाडी बंद पडली असेल तर पुणेकर रिक्षावाला हाच तुमचा खरा सारथी ठरु शकतो. असाच काहीसा अनुभव आला ‘मर्सिडीज-बेन्झ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मार्टिन श्वेंक यांना. श्वेंक हे त्यांच्या ‘मर्सिडीज एस क्लास’ने गाडीने प्रवास करत होते. मात्र ते पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले आणि त्यांना आपली कार रस्त्यात सोडून रिक्षाने प्रवास करावा लागला.

श्वेंक यांनी इन्स्ताग्रामवर यासंदर्भातील एक फोटो पोस्ट करत स्वत:च ही माहिती दिली आहे. मी माझ्या गाडीमधून खाली उतरलो. काही किलोमीटर चाललो आणि मग रिक्षा पकडली, असं श्वेंक यांनी म्हटलं आहे. त्यांनी रिक्षामध्ये बसून काढलेला फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक मजेदार प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकांनी त्यांना हा प्रवास कसा वाटला यासंदर्भात विचारलं आहे.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

“जर तुमची एस क्लास गाडी वाहतूक कोंडीमध्ये पुण्याच्या सुंदर रस्त्यांवर अडकून पडली तर तुम्ही काय कराल? कदाचित कारमधून उतरुन चालायला सुरुवात कराल. काही किलोमीटर गेल्यानंतर रिक्षा पकडाल?” अशा कॅप्शनसहीत श्वेंक यांनी हा रिक्षाच्या मागील सीटवरुन काढलेला फोटो शेअर केला आहे.

एकाने, ‘माझी गाडी अशी अडकली असती तर मी गाडीमध्ये बसून राहिलो असतो’ असं पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलंय. तर अन्य एकाने, ‘मी माझ्या महागड्या गाडीमध्ये बसून ती वाहतूक कोंडी सुटेपर्यंत आहे त्या ठिकाणी वाडापाव मागवला’ असता अशी प्रतिक्रिया दिली आहे.

श्वेंक हे २०१८ पासून ‘मर्सिडीज-बेन्झ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यापूर्वी ते ‘मर्सिडीज-बेन्झ चीन’ या कंपनीचे मुख्य आर्थिक नियोजन अधिकारी होते. ते २००६ पासून या कंपनीमध्ये काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांची जी ‘एस क्लास’ कार त्यांनी अर्ध्या वाटेत सोडली ती भारतात किमान १ कोटी ६० लाखांपासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.