सध्या देशाची राजधानी दिल्लीतील मेट्रो विविध कारणांमुळे प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपासून दिल्लीच्या मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कोणी मेट्रोमध्ये अंघोळ करतंय, तर कोणी गोधडी घेऊन झोपतंय. त्यामुळे दिल्ली मेट्रोमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असून संतापजनक प्रकारामुळे मेट्रो प्रशासनाला जोरदार ट्रोलही केले जात आहे. मात्र सध्या न्यूयॉर्क मेट्रोमधील एका तरुणाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मद्यधुंद अवस्थेत व्यक्ती धावत्या मेट्रोचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यादरम्यान, दरवाजा उघडल्यानंतर तो मेट्रो प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वी खाली उडी मारतो. त्यामुळे जमिनीवर पाऊल ठेवताच तो तोंडावर पडतो.व्हिडिओमध्ये मेट्रोच्या आत बसलेले लोक मोठ्याने त्या व्यक्तीला असं करू नको, असं सांगत असल्याचं ऐकू येतं. मात्र या सर्वाचा त्या व्यक्तीवर काहीही परिणाम होत नाही. पाहा व्हिडीओ हेही वाचा - वडिलांच्या रिटायरमेंटला मुलींनी दिलं खास सरप्राईज, Video बघून तुमचेही डोळे पाणावतील सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलहोत आहे. ज्याला Out of Context Human Race नावाच्या प्रोफाईलवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आलं आहे.