विज्ञान खूप पुढे गेलं आहे. त्यामुळे मानवाची प्रगती देखील होत आहे आणि त्याच बरोबर त्यांची जीवनशैली म्हणजेच राहणीमानही बदलत आहे. पण एक काळ असा देखील होता जेव्हा मानव देखील प्राण्यांप्रमाणे जंगलात राहत होते. त्याकाळात असे अनेक प्राणी होते, जे आजच्या जगात अस्तित्वात नाहीत. मॅमथ, डायनासोर इत्यादींचा यात समावेश आहे. हे असे प्राणी आहेत, जे हजारो लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झाले आहेत. पण जर आम्ही तुम्हाला सांगितल की, लाखो वर्षे जुना जीव पुन्हा एकदा पृथ्वीवर दिसला आहे, तर तुम्ही काय म्हणाल? अर्थात हे आश्चर्यकारक असले तरी हे खरे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये लाखो वर्षे जुना एक रहस्यमय प्राणी दिसला आहे, जो खूपच विचित्र दिसत आहे. असे सांगितले जात आहे की प्रागैतिहासिक काळापासून म्हणजेच ८० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहणारा हा शार्क आहे, ज्याला ‘द फ्रिल्ड शार्क’ असेही म्हटले जाते. हा विचित्र आणि भयंकर शार्क जपानच्या अवाशिमा बेटावर सापडला आहे , जो पाण्यात पोहताना दिसला होता. असे म्हटले जाते की या शार्कच्या तोंडात ३०० दात आहेत, ज्यामुळे ते खूप धोकादायक आहे.

( हे ही वाचा: Viral Video : ही भयानक मगर त्याच्या मांडीवर खेळते, सगळं काही ऐकते; विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ एकदा पहाच)

पाण्यात विचित्र शार्क पोहतानाचा व्हिडीओ पहा

( हे ही वाचा: VIDEO: व्यक्तीने झाडावर बनवली सर्वात सुंदर 3D पेंटिंग; Viral Video पाहून लोकही झाले थक्क!)

हा लाखो वर्षे भयंकर शार्कचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @wowinteresting8 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या २३ सेकंदांचा हा व्हिडिओ असून आतापर्यंत ३.९ मिलियन म्हणजेच ३९ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर या व्हिडीओला ७८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की हा शार्क बघून जुन्या पद्धतीचा वाटतो, तर कुणी म्हटलंय की याला बघून विश्वास बसत नाहीये.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions of years old mysterious animal found in japan this viral video will shock you too gps
First published on: 13-08-2022 at 19:05 IST