Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं खरं, पण या जेतेपदाची त्यांना खरंच किंमत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याला कारण ठरलाय ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो. हा फोटो खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिशेल मार्शच्या एका कृतीमुळे याला उन्माद म्हणावं की मस्ती? असा प्रश्न क्रिकेट चाहते उपस्थित करू लागले आहेत. मार्शच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रविवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतानं आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माच्या सुरुवातीच्या तडाखेबाज खेळीनंतर विराट कोहली व के. एल. राहुल वगळता अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातही अडखळत झाली. पहिल्या १० षटकांत ४१ धावांवर त्यांचे ३ गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांच्या १९२ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा विजय साकार झाला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

Australia Won World Cup 2023 Final: अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर, सगळ्यांना हस्तांदोलन करून होताच…

मिशेल मार्शचा उन्माद?

दरम्यान, रविवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकीकडे भारतीय क्रिकेटपटूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू विजयाचा जल्लोष करत होते. यावेळी भारतीय क्रिकेटपटूंनीही प्रथेप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडूचं आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन केलं. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रूममध्ये घडलेल्या एका प्रकाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे हा प्रकार समोर आला आहे. पॅट कमिन्सनं मिशेल मार्शचा खुर्चीवर बसून हातात एक बाटली असलेला फोटो शेअर केला आहे. पण या फोटोत खुर्चीवर रेलून बसलेल्या मार्शच्या पायाखाली चक्क विश्वचषक दिसत आहे. मार्शच्या बाजूलाही ऑस्ट्रेलिया सपोर्ट स्टाफपैकी एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. त्याचा हा फोटो स्वत: कर्णधार कमिन्सनं काढला की आणखी कुणी, हे स्पष्ट होऊ शकलं नसलं, तरी कमिन्सनं तो इन्स्टाग्राम स्टेटसवर ठेवल्यामुळे त्याचंही या कृतीला समर्थनच असल्याचं स्पष्ट होत आहे.

Australia Won World Cup 2023 Final: “ते जिंकत असताना राहुल द्रविड…”, हर्षा भोगलेंची ‘कोच सरां’साठी स्पेशल पोस्ट!

कारवाईची मागणी!

दरम्यान, मिशेल मार्शची ही कृती उन्मत्त असल्याची टीका क्रिकेट चाहते करत आहेत. काहींनी हा फोटो शेअर करून थेट आयसीसी व बीसीसीआयला कारवाई करण्याची मागणी केली आहे. “प्रिय आयसीसी व बीसीसीआय, मिशेल मार्शनं त्याच्या पायाखाली विश्वचषक ठेवल्याबाबत मला चिंता वाटत आहे. त्याची ही कृती क्रिकेट खेळाच्या नीतीमूल्यांचा अवमान आहे. कृपया या प्रकाराचा आढावा घेऊन योग्य ती कारवाई करावी”, अशी विनंती एका चाहत्याने एक्सवर (ट्विटर) केली आहे.

Story img Loader