scorecardresearch

स्मार्ट स्वयंचलित सायकल; App वरुन बूक केल्यावर तुम्हाला घ्यायला येणार

शहरांमधील अनेक समस्यांवर ठरु शकते सर्वोत्तम पर्याय

Persuasive Electric Vehicle (Photo: media.mit.edu)
‘एमआयटी मीडिया लॅब’ने पर्सूसिव्ह इलेक्ट्रीक व्हेईकल (पीईव्ही) नावाची एक भन्नाट सायकल तयार केली आहे. खास करुन शहरी भगांमधील वाहतूककोंडी सोडवण्याच्या उद्देशाने या ऑटोमॅटीक आणि स्मार्ट सायकल  तयार करण्यात आल्या आहेत. “अनेक शहरांमध्ये ४० टक्के जागा ही चारचाकी गाड्यांसाठी असते,” असं एमआयटीमधील सीटी सायन्स विभागाचे संचालक केंट लार्सन सांगतात. त्यामुळेच या सायकलच्या माध्यमातून शहरांमधील अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न एमआयटीने केलं आहे. यासंदर्भात मिडीया डॉट एमआयटी डॉट इयूडी या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठ आणि डेन्सो या जगातिक स्तरावरील वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीने एकत्र येऊन ही इलेक्ट्रीक बाईक तयार केली आहे. तांत्रिक दृष्ट्या ही बाईक नसून ट्राइक म्हणजेच तीन चाकांची सायकल आहे. या सायकलीला दोन चाकं पुढे आणि एक चाक मागे आहे. “हे बाईक चालवण्यासाठी सोयीस्कर, चारचाकी गाड्यांना उत्तम पर्याय” म्हणून पाहता येईल अशी आहे. ही सायकल प्रवासी वाहतूक त्याचबरोबर होम डिलेव्हरी करण्यासारख्या कामांसाठी वापरता येईल.

“ज्या व्यक्तीला ही सायकल हवी आहे तो मोबाइल अॅपच्या मदतीने ती बूक करतो. त्यानंतर या व्यक्तीच्या जीपीएस लोकशनपासून जवळ असणारी सायकल स्वत: रायडरपर्यंत येते. नियोजित राइड पूर्ण केल्यानंतर ही सायकल तिथेच सोडून दिल्यानंतर पुढील रायडरने बूक केल्यावर ही सायकल त्या व्यक्तीकडे जाते. म्हणजे हे अॅपवरील टॅक्सी सेवेसारखेच काम करते. फरक फक्त इतका आहे की येथे सायकल स्वत: कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय येते. मात्र याच तंत्रज्ञानामुळे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीची मदत न घेता मालाची ने-आण करणेही सोपे होणार आहे. या सायकलवर मागील अनेक वर्षांपासून एमआयटीमध्ये संशोधन सुरु होतं. मागील अवृत्तीपेक्षा आताची सायकल ही अधिक स्मार्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.

सायकलवर चालक असला तरी या पीईव्ही स्वत: नियंत्रण ठेवून चालू शकतात. चालकाच्या इच्छेनुसार तो ही सायकलसारखी चालवू शकतो. ही सायकल अगदी सोयिस्कर पद्धतीने डिझाइन करण्यात आली असून सायकल चालवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ती वापरताना भीती वाटणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. सामान्यपणे बाईक म्हटल्यावर दुचाकी येणाऱ्यांनाच ती चालवता येते असा समज चुकीचा असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. ही बाईक इलेक्ट्रीक असल्याने वाहतूककोंडीबरोबरच शहरामध्ये कमी प्रदुषण होण्यासाठी या सायकलचा फायदा होणार आहे. हा पाहा व्हिडिओ…

फिचर्स काय

या सायकलचे वजन ५० किलोहून कमी आहे. या सायकलमध्ये २५० वॅटची मोटर आहे. या मोटरला ऊर्जा पुरवण्यासाठी १० एएचची बॅटरी सायकलबरोबर देण्यात आली आहे. ही सायकल तासाला ३० किमी वेगाने जाऊ शकते. तसेच एकदा चार्ज केल्यावर ती ४० किमीपर्यंत प्रवास करते असा दावा एमआयटीच्या टीमने केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mits pev is an autonomous electric bike that will decongest cities of traffic scsg

ताज्या बातम्या