हे ट्रॅफिक आहे का? व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video | Mizorams aizawal traffic seen will shock you see how people follow rule watch viral video | Loksatta

हे ट्रॅफिक आहे का? व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video

मिझोराममधील ऐझॉलयेथील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे

हे ट्रॅफिक आहे का? व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले, पाहा Viral Video
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील ट्रॅफिकचे स्वरूप अचंबित करणारे आहे (फोटो: सोशल मीडिया)

मुंबई, दिल्ली, पुणे इथे राहणाऱ्या किंवा या शहरात एकदा तरी जाऊन आलेल्या लोकांनी तिथल्या ट्रॅफिकचा अनुभव नक्कीच घेतला असेल. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर तासनतास एकाच ठिकाणी अडकून राहणे सर्वांनाच त्रासदायक वाटते. त्यात लवकर ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत अनेकजण ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करत आणखी ट्रॅफिक वाढवतात आणि त्यात सातत्याने वाजणारे हॉर्न यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. असा अनुभव तुम्हीहो घेतला असेल, पण सध्या व्हायरल होणारा ट्रॅफिकचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मिझोराममधील ऐझॉलयेथील आहे. या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक दिसत आहे, मात्र याचे स्वरूप नेहमीपेक्षा वेगळे आहे. कारण यात गाड्या एका रेषेत जात असल्याचे दिसत आहेत. बाइकही इतर गाड्यांना ओव्हरटेक न करता एका रेषेत जात असल्याचे दिसत आहेत. ट्रॅफिकचे असे स्वरूप तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: मुंबईमधील रिक्षाचालकाने चक्क ऐकवली युरोपीय देशांची यादी; Viral Video पाहून नेटकरीही झाले अवाक

मिझोराममधील या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव होत असून, या व्हिडीओला ५७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येक शहरामध्ये असे नियमांचे पालन व्हायला हवे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 13:17 IST
Next Story
‘श्री हर्षद मेहता प्रसन्न!’ पाहा शेअर मार्केट प्रेमीची ही भन्नाट लग्नपत्रिका, देवांच्या जागी ‘बिग बुल’ची नावं