मध्य प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथल्या एका मोबाईलच्या दुकानातल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एक जण आपला मोबाईल फोन या दुकानात घेऊन आला होता. दुकानदाराने तो मोबाईल हातात घेऊन बॅटरी काढत असताना अगदी बॉम्ब फुटावा असा मोठा स्फोट झाला आणि हातातच मोबाईल फुटला. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा थरकाप उडेल, हे मात्र नक्की.

मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटमध्ये ही घटना घडली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानात एक ग्राहक त्याचा मोबाईल फोन घेऊन येतो. दुकानात दुकानदार उभा असल्याचं दिसून येतंय. या वेळी ग्राहक काऊंटरच्या जवळ उभा असलेला दिसून येतोय. दोघे या मोबाईल फोनबद्दल बोलत असताना दुकानदार मोबाईल फोन हातात घेतो आणि मोबाईलची बॅटरी काढण्याचा प्रयत्न करतो. बहुतेक हा ग्राहक आपल्या मोबाईल फोनची बॅटरी बदलण्यासाठी आलेला असावा. बंटी लिल्हारे नावाच्या व्यक्तीचं हे दुकान आहे. जसंच बंटीने त्या मोबाईलची बॅटरी काढली तसाच दुकानात मोबाईलचा स्फोट होतो. त्यानंतर मोबाईलमध्ये स्फोट झालेला पाहून दुकानदाराने घाबरून तो मोबाईल हातातून फेकून दिला. तो काऊंटरवरच जाऊन पडतो. त्यामुळे सुदैवाने या घटनेत दुकानदार आणि ग्राहक यापैकी कुणालाही इजा झालेली नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाकिस्तानींनी ‘चप्पल मार मशीन’चा लावला शोध, लोक म्हणाले, “अप्रतिम ऑटोमेशन!”, कमेंट्सचा महापूर!

स्फोट झालेला मोबाईल जळत्या अवस्थेत काउंटरवर पडलेला पाहून दुकानदार काहीसा घाबरतो. तो क्षणाचाही विलंब न लावता आपल्या हातानेच तो पेटता मोबाईल दुकानाबाहेर ढकलतो. त्याचवेळी मोबाईल स्फोटाच्या घटनेच्या वेळी दुकानात इतर लोकही उपस्थित होते. मोबाईलचा स्फोट होताच तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांना धक्का बसला. त्याचवेळी मोबाईल स्फोटाची ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. कोणाच्याही मोबाईलची बॅटरी फुटल्यास तत्काळ मोबाईल शॉपीमध्ये जाऊन तपासणी करून घ्या आणि अपघात टाळा, असे आवाहन दुकानदाराने केले आहे.

आणखी वाचा : सांगा प्राणी कोण? बिबट्याची शेपूट आणि पाय ओढून खेचत होता, लोक VIDEO बनवत राहिले…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Janmashtami 2022: मुंबई पोलिसांच्या बँड पथकाने वाजवलं ‘मच गया शोर सारी नगरी रे’ गाणं, VIRAL VIDEO ने जिंकली सर्वांची मने

हा व्हिडीओ पाहून लोक फोन व्यवस्थित हाताळण्याचं आवाहन करत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे; परंतु मोबाईलच्या अतिवापरामुळे बॅटरीचा स्फोट होण्यांच्या घटनांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज अशा घटना आपल्याला वाचायला किंवा पाहायला मिळतात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे; तर काहींना अपंगत्व आले आहे. काही ठिकाणी घर किंवा प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये योग्य सावधानता बाळगणं गरजेचं असल्याचं देखील काहीनी मत व्यक्त केलं आहे.