महिलेने आधी स्वतःसोबत केले लग्न; आता ‘या’ कारणामुळे घेणार घटस्फोट

काही महिन्यांपूर्वी या महिलेने स्वतःशी लग्न केले तेव्हा तिचा फोटो खूप व्हायरल झाला होता.

Model cris galera who married herself divorces herself after
(फोटो सौजन्य- cristianegaleraoficial /Instagram)

भारतासह जगभरातून लग्न आणि नातेसंबंधांची अनेक विचित्र अशी प्रकरणे समोर येत राहतात. सध्या एक महिला तिच्या लग्न आणि घटस्फोटामुळे चर्चेत आहे. या महिलेने सप्टेंबरमध्ये स्वतःशी लग्न केले होते, त्यादरम्यान महिलेचे हे लग्न जगभर प्रसिद्ध झाले होते. मात्र आता या महिलेने स्वतःच्या लग्नापासून घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटामागे महिलेने कारणही सांगितले आहे.

ब्राझीलमध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव क्रिस गॅलेरा आहे. गॅलेरा ही ब्राझीलमधील प्रसिद्ध मॉडेल आहे. तिने स्वतःशी लग्न केले होते कारण ती म्हणाली की ती पुरुषांवर विश्वास ठेवून कंटाळली आहे. तिला कोणत्याही प्रकारचा जोडीदार सापडत नाही. पण आता कदाचित या क्रिस गॅलेराला असा मुलगा सापडला आहे आणि ती लवकरच त्याच्याशी लग्न करणार आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, महिलेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितले की लग्नानंतर ती खूप आनंदी होती आणि तिला कोणाचीही कमतरता जाणवली नाही. तसेच तिला पती नसल्याचे ही दुःख नव्हते. पण आता तिला स्वतःला घटस्फोट घ्यावा लागला आहे, कारण आता तिच्या आयुष्यात एका व्यक्तीचा प्रवेश झाला आहे, ज्यावर ती खूप प्रेम करते.

गॅलेराने असेही सांगितले की जो व्यक्ती तिच्या आयुष्यात प्रवेश करत आहे तो तिचा जोडीदार होण्यास पात्र आहे आणि आता तिला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. मात्र गॅलेरा ती व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती दिलेली नाही पण घटस्फोट घेणार असल्याची माहिती तिने दिली आहे. त्यामुळे या गॅलेराच्या या नव्या विवाहाची गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी गॅलेराने स्वतःशी लग्न केले तेव्हा तिचा फोटो खूप व्हायरल झाला होता. काहींनी तिचे कौतुक केले तर काहींनी खिल्लीही उडवली. तर तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या अनेक पुरुषांकडून तिला विनंती करण्यात आली होती.. सध्या गॅलेरा आता स्वतःहून घटस्फोट घेऊन दुसऱ्याशी लग्न करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Model cris galera who married herself divorces herself after abn

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या