scorecardresearch

बिकिनीमध्ये कॉफिनसह मॉडेलने दिल्या पोज, अंत्यसंस्कार कंपनीची वादग्रस्त जाहिरात Viral

ही कंपनीकडे प्रशिक्षित एजंट आहेत जे अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया आयोजित करतात. सोशल मीडियावर कंपनीवर बरीच टीका होत आहे.

Model poses with coffin in bikini
वादग्रस्त जाहिरात व्हायरल (फोटो: @horonim.ru / Instagram)

मृत्यू कोणाचाही झाला तरी ते दुर्दैवीच आहे. पण त्याहूनही दुर्दैवी गोष्ट म्हणजे मृत्यूची थट्टा. अनेकवेळा लोक मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दलची संवेदनशीलता विसरून असे कृत्य करतात ज्यामुळे वाद निर्माण होतो, परंतु अलीकडेच एका फ्युनरल कंपनीच्या व्हायरल जाहिरातीने तर मर्यादा ओलांडली आहे. कंपनीच्या एका जाहिरातीमध्ये बिकिनी घातलेल्या मॉडेल पोज देताना दिसत आहेत.

नक्की काय झालं?

रशियाची होरोनिम अंडरटेकर्स (HORONIM.RU undertakers) नावाची अंत्यसंस्कार कंपनी सध्या चर्चेत आहे. कंपनीने नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका जाहिरातीच्या शूटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिकिनी घातलेल्या अनेक मॉडेल्स दिसत आहेत, ज्या शवपेटी आणि अंत्यसंस्कारात वापरल्या जाणार्‍या इतर वस्तूंसोबत पोज देताना दिसत आहेत. एकीकडे बिकिनी घातलेल्या मॉडेल्स लोकांना पचनी पडत नाहीत, तर दुसरीकडे व्हिडीओतील पोज अशा आहेत की त्यांना पाहून लोकांचा पारा चढला आहे.

(हे ही वाचा:कोंबडी आणि कोब्रामध्ये रंगली लढत; कोण जिंकलं? पाहा या Viral व्हिडीओमध्ये)

मॉडेल्स शवपेटीवर बसून पोज

रशियातील मॉस्को येथे असलेल्या या कंपनीच्या जाहिरातीत अंत्यसंस्काराच्या जाहिरातीत बिकिनी परिधान केलेल्या मॉडेल्सही शवपेटीच्या वर आक्षेपार्ह अवस्थेत पोज दिसतात. ही कंपनी सर्व वयोगटातील नागरिकांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चात कपात करत आहे. जाहीरातीमध्ये सांगण्यात आले आहे की कंपनीकडे प्रशिक्षित एजंट आहेत जे अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया आयोजित करतात.

(हे ही वाचा: Union Budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी चर्चेत; जाणून घ्या खासियत)

(हे ही वाचा: Video: लाइव्ह मॅच दरम्यान जाणवले भूकंपाचे धक्के, घटना कॅमेऱ्यात कैद)

नेटीझन्सने जाहिरातीवर उपस्थित केले प्रश्न

सोशल मीडियावर कंपनीवर बरीच टीका होत आहे आणि लोक ट्रोलही करत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिलंय की लोक आपलं क्षेत्र विसरले आहेत. जग वेडे झाले आहे. एकाने लिहिले – अशा दुःखद आणि वैयक्तिक गोष्टीची जाहिरात करण्यासाठी अर्धनग्न महिलांची काय गरज आहे. ही जाहिरात मृत लोकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चेष्टा करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Model poses with coffin in bikini funeral company controversial ad goes viral ttg

ताज्या बातम्या