scorecardresearch

फॅशन शोदरम्यान धडाधड कोसळल्या मॉडेल्स; व्हायरल Video वर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “का करतात अशा…?”

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला ग्लॅमरस दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल.

models fell on runway in fashion show video went viral on social media
फॅशन शोदरम्यान धडाधड कोसळल्या मॉडेल्स, व्हायरल Video वर नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, "का करतात अशा…" (photo – runwaymodellll instagram)

सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मनोरंजक; तर काही फार विचार करायला लावणारे असतात. काही वेळा काही व्हिडीओ आपण विचारही केला नसेल अशा वास्तव्याची जाणीव करून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हाला ग्लॅमरस दुनियेतील वास्तव्याची जाणीव होईल.

ग्लॅमर आणि मॉडेलिंगच्या जगात जरी आपल्याला लाईट्स, भव्य-दिव्य सेट्स आणि चकाकणारे अनेक सुंदर चेहरे दिसत असले तरी या जगातही प्रत्येक मॉडेलला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. दररोज कोणत्या ना कोणत्या आव्हानाचा सामना त्या करीत असतात. त्यात अगदी कमी वेळात कपडे बदलण्यापासून ते फॅशन शोदरम्यान शेकडो लोकांसमोर निर्भयपणे चालण्यापर्यंत अशी अनेक आव्हाने असतात. मॉडेलिंगदरम्यान चालताना अनेकदा अपघात होतात, काही वेळा मॉडेल्स लाइव्ह शोदरम्यानही कोसळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका फॅशन शोदरम्यान एकामागोमाग एक-दोन मॉडेल्स चालता चालता खाली कोसळल्या.

aaji dance video
६५ वर्षांच्या आजीची माधुरी दीक्षितला टक्कर! बॉलीवूड गाण्यांवर करतात तुफान डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल घायाळ
isabled young woman Dhol Vadan with one hand
”ताई, तुला मानाचा मुजरा”, एका हातानेच ढोल वादन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी तिच्या जिद्दीचे केले कौतूक
A person uses a railway track to reach another platform and in the process his slipper falls off
लोकल ट्रेन समोरून येत असताना तो ट्रॅकवर चप्पल घालू लागला अन् क्षणात…VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
funny video goes viral instagram
VIDEO : जेव्हा मराठमोळ्या आजीला नात हिंदी गाणं शिकवायला जाते…; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही…

पाण्याचा ड्रम आणि मोटरपासून बनवली वॉशिंग मशीन, व्यक्तीचा जुगाड Video पाहून युजर्स म्हणाले, “भारतात टॅलेंट…”

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये Givenchy Spring Summer 2018 ची झलक पाहायला मिळत आहे. या शोदरम्यान एकामागोमाग एक मॉडेल पायऱ्या उतरून रॅम्पवर चालताना दिसत आहेत. अशाच प्रकारे एक मॉडेल जिन्यावरून खाली उतरत असते, यावेळी तिचे शूज पायऱ्यांमध्ये अडकतात आणि ती जोरात खाली कोसळते. त्यानंतर दुसरी मॉडेलही रॅम्पवर चालता चालता कोसळते. मग उपस्थित लोक तिच्या मदतीसाठी पुढे येतात.

@Runwaymodelll नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोक कमेंट करून मॉडेल्सच्या आयुष्यातील अडचणींबद्दल बोलत आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपल्याला ठाऊक असायला हवे की, अर्ध्या मॉडेल्सनी असे शूज घातले आहेत; जे त्यांच्या पायांना नीट फिट होत नाहीत.” दुसर्‍याने युजरने लिहिलेय, “त्यांच्या शूजकडे पाहूनच समजेल की, ते घालून चालणे किती कठीण आहे.” तिसर्‍याने लिहिलेय, “मॉडेल्सचा जीव धोक्यात घालून, त्यांना दुखापत करणाऱ्या डिझायनर्सचा मला खूप तिरस्कार वाटतो.” शेवटी एका युजरने सवाल केला, “डिझायनर्स कोणतेही कारण नसताना अशा पॅलेट पायऱ्या का बसवतात?”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Models fell on runway in fashion show video went viral on social media sjr

First published on: 20-11-2023 at 18:31 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×