VIDEO : जळून खाक झालेलं ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ पूर्वी असं दिसायचं

१४ जणांना आपले प्राण गमवावे लागले

मोजो रेस्तॉ-बार कसा दिसायचा याचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. (सौजन्य : युट्यूब/ कर्ली टेल्स)

या दोन्ही फोटोंमधील तफावत बरचं काही सांगून जाते. गुरुवारी रात्री कमला मिल कंपाऊंडमधल्या ‘ट्रेड हाऊस’ इमारतीच्या छतावर भीषण आग लागली. या आगीत १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. छतावर असणारे ‘मोजोस ब्रिस्ट्रो’ आणि ‘१ अबव्ह’ या पब आणि रेस्तॉराँची जळून राख झाली.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वाऱ्यामुळे ही आग अधिक पसरत गेली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. दोन्ही ठिकाणी असणारं लाकडाचं फर्निचर, प्लॅस्टिक आणि बांबूपासून उभारलेलं रुफटॉप यामुळे आगीचा भडका उडाला ही आग अधिकच पसत जात तिनं रौद्र रुप धारण केलं. रूफ टॉप रेस्तॉराँमुळे रात्रीचा एक वेगळाच माहोल येथे असायचा आणि याच कारणामुळे अनेक तरूण येथे आकर्षित व्हायचे.

हा मोजो रेस्तॉ-बार कसा दिसायचा याचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ‘कर्ली टेल्स’नं काही महिन्यांपूर्वी या मोजो बारचा छानसा व्हिडिओ तयार केला होता. तिथला माहोल पाहून तिथे जाण्याची एखाद्याची इच्छा झाली नाही तर नवलच. पण, आता मात्र इथे ना झगमगाट आहे, ना तो माहोल आहे. इथे फक्त आणि फक्त शिल्लक आहे ती या दोन्ही रेस्तॉराँची राख.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mojos bistro rooftop lounge before kamala mills fire tragedy