Monalisa Bhosle marries Farman Khan: प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी मोनालिसा तिच्या सुंदर तपकिरी डोळ्यांमुळे ती खूप चर्चेत आली होती. तिचं नुकतंच लग्न पार पाडलं. मोनालिसाचं मंदिरात लग्न होत असतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मोनालिसाने आपल्या प्रियकर फरमान खानसोबत केरळमध्ये लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नाला तिच्या कुटुंबाचा विरोध होता. या दोघांनी ११ मार्च रोजी केरळमधील अरुमनूर श्री नैनार देवा मंदिर लग्न केले.

मोनालिसा ही मूळची इंदोरची आहे, तर फरमान महाराष्ट्रातील रहिवासी आहे. दोघांची ओळख सुमारे ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर झाली होती आणि नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले.

मोनालिसाच्या कुटुंबाचा नात्याला विरोध

मोनालिसाचे वडील जयसिंग भोसले यांनी त्यांच्या आंतरधर्मीय नात्याला जोरदार विरोध केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांनी या नात्याला विरोध केला. तसेच त्यांनी मोनालिसावर तिच्या एका दूरच्या नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकल्याचेही सांगितले जाते.

मोनालिसा अलीकडे तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपट “नगम्मा”च्या शूटिंगसाठी तिरुवनंतपुरम येथे होती. त्या काळात तिच्या वडिलांना ती तिथे असल्याचे कळले आणि त्यांनी तिला परत इंदोरला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असे सांगितले जाते.

जोडप्याने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली

या घटनेनंतर मोनालिसा आणि फरमान यांनी थंपानूर पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षणाची मागणी केली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना ठाण्यात बोलावले आणि मोनालिसा १८ वर्षांची असल्यामुळे तिला कोणासोबत राहायचे याचा कायदेशीर हक्क असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, या सगळ्यानंतर मोनासिलाने पत्रकार परिषद घेतली. ज्याच तिने स्वत:च्या इच्छेने आणि मर्जीने लग्न केल्याचं कबूल केलंय. तसंच त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं आणि ती सर्व धर्म समभाव मानते. ती नुकतीच १८ वर्षाची झाली आणि घरचे जबरदस्ती तिच्या नातेवाईकांमधील एका मुलाशी लग्न लावून देत असल्याने तिने हा निर्णय घेतला. तसंच हे लग्न म्हणजे लव्ह जिहाद नाही विधान तिने आणि तिच्या नवऱ्यानं केलं. तिचा हा व्हिडीओ @PTI_News च्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

याआधी महाकुंभ मेळ्यात मोनालिसा रुद्राक्षाच्या माळा विकताना दिसलेल्या एका व्हिडिओमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमुळे ती अचानक इंटरनेटवर खूप प्रसिद्ध झाली.