Money Counting Desi Jugaad Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन ट्रिक्स, जुगाड व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही जुगाड हे आपल्या रोजच्या वापरासाठी खरंच खूप फायदेशीर असतात. ज्यामुळे अनेकदा कठीण काम कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. सध्या नोटा मोजण्याचा असाच एक जुगाड व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती पाचशेच्या नोटा अशा काही मोजतोय की पाहू तुम्ही डोकचं धराल.
पैसे मोजण्याचा देसी जुगाड
व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, एक व्यक्ती ₹५०० च्या नोटांचा बंडल हातामध्ये पकडते. त्यानंतर तो त्या बंडलमधील एक नोट काढून ती इतर नोटांवर एका विशिष्ट पद्धतीने फोल्ड करतो. पुढे तो आपल्या अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने इतर नोटा हळूहळू पुढे सरकवतो आणि त्या आतल्या बाजूला व्यवस्थित सेट करतो. अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण बंडल त्या एका दुमडलेल्या नोटेच्या आधारे बांधला गेल्यासारखा दिसतो. यानंतर ती व्यक्ती आपली ट्रिक दाखवत नोटा एक-एक करून सहज बाहेर काढते आणि मोजते. या पद्धतीमुळे नोटा लवकर वेगळ्या होतात आणि मोजणे सोपे जाते, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर कमेंट्स करतायत. एका युजरने लिहिले, “भाऊ, मोजण्यासाठी एवढे पैसे पण असायला हवेत ना!” तर दुसऱ्याने कमेंट केली की, “एवढ्या वेळात तर मी सगळे पैसे मोजून मोकळा झालो असतो.” आणखी एकाने लिहिले, “मोजायला तर सोपे जाईल, पण ते पैसे परत एकत्र करायला जास्त वेळ लागेल.”
नोटा मोजण्याची भन्नाट ट्रिक ( Money Counting 500 Rupee Note Viral Video)
अनेक युजर्सना ही पद्धत फारशी आवडलेली नाही. एकाने लिहिले, “जितक्या वेळात हे फोल्ड तयार होतील, तितक्या वेळात मी दोनदा पैसे मोजले असते.” तर दुसऱ्याने म्हटले, “एवढ्या वेळात आम्ही ६ वेळा पैसे मोजून १० वेळा बाहेर काढले असते, एवढा पसारा मांडायची काय गरज आहे?”
