Viral video: जंगलाचा राजा सिंह, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. सिंहाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे सिंहाच्या नादाला कुणी लागत नाही. पण अशी हिंमत मुंगूसानं केलीय. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका मुंगूसानं जंगलातल्या चक्क विशाल प्राण्याला आस्मान दाखवलंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

साप आणि मुंगूसाच्या लढाईचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. दोघंही एकमेकांचे कट्टर शत्रू. पण कधी मुंगूसाला सिंहावर हल्ला करताना पाहिलं आहे का? नाही ना..मग हा व्हायरल व्हिडीओ पाहा. यामध्ये मुंगूसानं चक्क सिंहाला टक्कर दिलीय. एक दोन नाहीतर तीन तीन सिंहाला एकटा मुंगूस पुरुन उरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंगूस सिंहाच्या जवळ जातो. सिंह तसा मागे जातो. मुंगूस सिंहावर हल्लाही करताना दिसतो. आजवर तुम्ही सिंहाला असं कधीच पाहिलं नसेल. एरवी शिकारीसाठी वाऱ्याच्या वेगाने धावून येणाऱ्या सिंहाची हवा मुंगूसाला पाहून मात्र टाइट झाली आहे. मुंगूस जवळ आल्यावर तो आपली पावलं मागे घेतो.

शेवटी काय घडलं?

हा व्हिडीओ पाहताना शेवट नक्की काय होईल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती मात्र शेवटी या लढाईत कोण जिंकलं ह व्हिडीओ पाहून सांगणं कठीण आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाचा विजय झाला हे आम्हाला कमेटं करुन नक्की कळवा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “हे चालणार नाही” FIR नोंद करायला महिना लावला; पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याची केली आरती

एका छोट्याश्या मुंगूसानं सिंहाला माघार घ्यायला लावली हे पाहून सगळेच अवाक् झाले. सर्वजण मुंगूसाच्या हिंमतीला दाद देत आहेत.

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “मुंगूसाच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला.”