Mongoose Attack Snake Viral Video: साप आणि मुंगूस यांच्यात जन्मोजन्मीचे वैर आहे. एकमेकांचे शत्रू असणारे हे दोघे जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाणार हे निश्चित असते. या लढाईमध्ये एक जीव वाचवण्यासाठी, तर दुसरा जीव घेण्यासाठी लढत असतो. त्यात साप हा अतिशय विषारी प्राणी आहे, ज्याच्या दंशाने मनुष्याचा नाही, तर प्राण्याचाही उपचारांअभावी मृत्यू होऊ शकतो; पण मुंगुसासमोर त्याचं काहीच चालत नाही. कारण मुंगूसाला आपल्या धारधार दातांनी सापाला गंभीर जखमी करु शकतो. तसेच मुंगूस सापापेक्षा चपळ असतो. जो सहस उड्या मारुन सापाच्या हल्ल्याचा प्रतिकार करु शकतो. त्यामुळे मुंगूस मृत्यूची पर्वा न करता, सापाशी भिडतो. सध्या सोशल मीडियावर साप आणि मुंगुसाच्या लढाईचा असाच एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात शेतात सापाला पाहताच मुंगूस चवताळतो आणि नंतर तो असं काही करतो की ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

साप आणि मुंगूस यांचे वैर जन्मोजन्मीचे. ते किती टोकाचे असेल हे देखील सर्वांनी ऐकले असेल. एकमेकांचे कट्टर शत्रु असणारे हे दोघेही जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा कुणा एकाचा तरी जीव जाईपर्यंत ते एकमेकांना सोडत नाही. पेंच व्याघ्रप्रकल्पालगत राष्ट्रीय महामार्गावर खवासाजवळ मुंगूस आणि कोब्रा समोरासमोर आले. त्यांच्यात सुरुवातीला ‘कोल्डवॉर’ रंगले आणि नंतर दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल, तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी; अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षित नसतं. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच थरार साप आणि मुंगूस यांच्यामध्ये पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सापानं पहिला हल्ला केला. त्यानं फणा काढून मुंगूसाला दंश केला. पण मुंगूसाला सापाच्या विषानं काहीच फरक पडत नाही. त्यानं दुसऱ्याच क्षणी तो वार झेलला आणि एका झटक्यात सापाच्या तोंडाचा चावा घेऊन खेळ संपवला. . मुंगूस हा भयंकर मोठा शिकारी आहे. तो सहसा विनाकारण शिकार करत नाही, पण सापाला ते मारतात कारण साप हे मुंगूसच्या आहारातील मुख्य अन्न आहे. साप मनुष्यासहित अनेक प्राण्यांना पाणी पाजतो, तोच साप मुंगुसासमोर नांगी टाकतो.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mi_ek_shetkari_akash नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.