Monitor Lizard entered the house viral video: जंगलतोडीमुळे मानवी वस्तीत जंगली प्राण्यांचा वावर आता अगदी सामान्य झाला आहे. प्राण्यांचे मानवी वस्तीत शिरतानाचे, वावर करतानाचे अनेक व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये कधी प्राणी कोणाच्या घरात शिरताना दिसतात तर कोणावर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक घोरपड एका घरात घुसलीय. घोरपड घरात घुसल्यानंतर नेमकं काय घडतं ते जाणून घेऊ या.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका घरात चक्क घोरपड घुसते. घरातील सगळी माणसं झोपेत असताना हळूच घोरपड घरात घुसते. घराचा दरवाजा उघडा असल्याने घोरपडीला घरात घुसायला चांगलाच वाव मिळाला असल्याचं या व्हिडीओत आपण पाहू शकतो. या घरात कोणी सोफ्यावर तर कोणी जमिनीवरच झोपलं होतं. अचानक घोरपड घरात शिरली आणि इथे तिथे फिरू लागली. पण, घोरपडीने कोणालाही इजा केली नाही. घोरपड फिरत असताना अचानक सोफ्यावर झोपलेल्या एका माणसाला जाग आली आणि त्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकताच घोरपड घाबरून बाहेर पळाली. घरातली बाकीची मंडळीही उठून जागी झाली आणि हे पाहून त्यांना जब्बर धक्का बसला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

https://www.instagram.com/reel/DAUwdOFSSUJ/?igsh=YWw0YmVjeGUyMXFi

हा व्हायरल व्हिडीओ @unprofessional_memes4u या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची आहे”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे; तर या व्हिडीओला तब्बल ११.५ मिलियन व्ह्यूज आले आहेत. यादरम्यान ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

हेही वाचा… बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मी जर या घोरपडीला प्रत्यक्षात पाहिलं असतं तर माझा धरतीवरचा शेवटचा दिवस असता.” तर दुसऱ्याने “घोरपडच त्यांना घाबरली आणि पळून गेली” अशी कमेंट केली; तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “घोरपडीला कदाचित घर आवडलं नसेल म्हणून ती अशी पळून गेली.”

हेही वाचा… परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान

दरम्यान, याआधीही अशा अनेक घटना ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील घडल्या आहेत, जिथे प्राणी चक्क वस्तीत घुसले आहेत. असे व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं आहे.

Story img Loader