Viral Video : ‘हे’ माकड खरंच पेट्रोल पितं?

दिवसाढवळ्या तरूणांनी त्याला पकडलं

या तरूणांनी पेट्रोल पिणाऱ्या माकडाचा व्हिडिओ व्हायरल केला.

पर्यावरणातल्या बदलामुळे अनेक प्राण्यांनी आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत, हे आपण अनेकदा उदाहरणांसह पाहात आलोय. त्यातून माकडासारख्या प्राण्यांना तर सर्रास जंक फूड खाण्याची सवय झाली आहे. भारताच्या अनेक प्रेक्षणीय स्थळांवर माकडं हमखास आढळतात. आलेले पर्यटक त्यांना वेफर्स, चिवडा, शीतपेय देतात, त्यामुळे हे प्राणी आता जंगलातील फळांवर कमी आणि जंक फूडवर जास्त जगू लागल्याचं समोर आलंय. अनेक पर्यावरण प्रेमी, प्राणिप्रेमींनी यात स्वत:हून लक्ष घालायला सुरूवात केली आहे.

Viral : विमा कंपनीने मागितले फ्रंट- बॅक फोटो, तरुणीने चुकून पाठवले स्वत:चे फोटो

ही परिस्थिती गंभीर असताना एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात चक्क माकड दुचाकीमधलं पेट्रोल पिताना दिसत आहे. हा व्हिडिओ पानिपतमधला असल्याचे समजत आहे. यात काही तरूणांनी माकड दुचाकीचा पेट्रोल पाईप तोडून त्यातून पेट्रोल पित असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमधलं पेट्रोल कमी होत असल्याचे काही चालकांच्या लक्षात आलं. कोणीतरी बाईक मधलं पेट्रोल चोरत असावं अशी, शंका त्यांना आली, म्हणून त्यांनी दोन-तीन दिवस पार्किंग परिसरात लक्ष ठेवलं तेव्हा माणूस नाही तर माकड पेट्रोल पित असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
या तरूणांनी पेट्रोल पिणाऱ्या माकडाचा व्हिडिओ व्हायरल केला, या व्हिडिओची सत्यता ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने पडताळली नाही, पण माकडच पेट्रोल पित असल्याचा दावा काही तरुणांनी केला आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याची खूपच चर्चा आहे.

Video : तरुणांचे गीर अभयारण्यात संतापजनक वर्तन

(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Monkey drinks petrol from parked bikes video goes viral

ताज्या बातम्या