Monkey Enters House Viral Video : माकड हे इतके चतूर आणि खोडकर असतात की तो वाघाशी पंगा घ्यायलाही मागे पुढे पहात नाही, एकदा का माकडाने पाठलाग सुरू केला तर तुमचं काही खरं नाही, माकड अगदी घरात शिरून असा काही हैदोस घालतो की पाहून आपल्याला भीती वाटते, कारण तो कधी कोणती गोष्ट पळवून नेईल काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एका घरात माकड शिरल्याने त्या कुटुंबाची कशी धांदल उडाली हे दिसतेय.

सोशल मीडियावर माकडाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात तो कधी कोणाच्या हातून वस्तू, खाणं हिसकावून घेताना दिसतो तर कधी एखाद्याला त्रास देताना दिसतो. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक वेगळेच दृश्य दिसतेय. एक माकड कोणाच्यातरी घरात शिरून फ्रिजवर चढताना दिसतंय. यानंतर तो चक्क फ्रिज उघडतो आणि खाण्यास काय मिळतंय हे शोधत असतो. हे पाहून घरातील एक महिला ओरडत धावत येते आणि त्याला हुसकावून लावण्यासाठी फडकं त्याच्या दिशेने भिरकावते, पण ते माकड काही जागचे हलले नाही, त्याने बदामाचे एक पाकीट घेतले, त्यानंतरच तिथून धूम ठोकली.

यावेळी त्या घरातील एका मुलीने हा व्हिडीओ शूट केला आणि तो आता व्हायरल होतोय; यावरून माकड किती चपळपणे वागतो हे दिसते.

माकडाचा हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, आता पुढच्या आठवड्यात तो दागिने घेऊन पळून जाईल, बदामांमुळे त्याची बुद्धी तल्लख होईल. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, त्याने काहीतरी उपयुक्त वस्तू घेतली आहे. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, तो नक्कीच काहीतरी विसरत असणार, म्हणूनच तो बदाम घेऊन गेला.