Monkey Enters Jewellery Shop Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ फार रंजक, मजेशीर असतात; जे पाहून अनेकदा हसू आवरणं अवघड होतं. सध्या माकडाचा एक असाच मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात माकड सोन्याच्या दुकानात असं काही करतं बसलयं की पाहून तुम्हालाही हसू येईल.
यात मजेशीर गोष्ट म्हणजे माकड सोन्याच्या दुकानात शिरलेय, तरी तिथले लोक त्याला पळवायचे सोडून तो काय काय करतोय ते आरामात बघत बसलेत.
व्हिडीओत पाहू शकता की, एक भलंमोठं माकड थेट सोन्याच्या दुकानात शिरते. त्यानंतर तिथल्या गणपतीच्या फोटोवर जाऊन बसते आणि इथे तिथे पाहू लागते, काही सेकंद थांबते आणि सीसीटीव्हीच्या स्क्रीनकडे अगदी जवळ जाऊन पाहते. यानंतर खाली उतरते आणि दुकानात ठेवलेल्या बुकेतील फुलं खाऊ लागते, एक कर्मचारी तो बुके उचलून दुसरीकडे ठेवत असतो ते पाहून माकड भडकतो आणि त्याच्याकडून बुके ओढण्याचा प्रयत्न करतो, कर्मचारी त्याला केळं देत असतो, पण ते न घेता माकड देव्हाऱ्यातील मिठाई उचलून आरामात खाऊ लागतो. अशाप्रकारे काहीवेळ टाईमपास करून ते माकड दुकानाबाहेर पडते.
माकडाचा हा व्हिडीओ sanjaydey2000′ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर आता लोकही मजेशीर कमेंट्स करत आहेत. काहींच्या मते, जणू काही बजरंगबली स्वत: सोनं खरेदी करण्यास आला आहे, तर काही जण म्हणतायत की, जणू काही एखादे माकड तपासणीसाठी आले आहे.
