viral video: माकड हे नेहमीच धुडगुस घालत असतात. त्यांच्या हातात एखादी वस्तू लागली की ते मग द्यायचं नाव घेत नाहीत. तुम्हाला माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट तर माहित असेल. शिवाय तुम्ही यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ देखील पाहिले असतील. ज्यामध्ये माकड कधी लोकांचं खाणं घेऊन पळतो तर कधी एखादी वस्तू. दरम्यान या गोष्टीचा खरा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आला आहे.
सध्या माकडाचा आणि काही गावकऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये माकडाने एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला आहे. तर त्याच्या बदल्यात सदर व्यक्ती त्याला फ्रुटी देताना दिसत आहे. माकडाच्या हातात फ्रुटी पडल्यानंतर लगेच माकड सदर व्यक्तीचा फोन खाली टाकून देत आहे.




मोबाईलच्या बदल्यात माकडाला फ्रुटी द्यावी लागली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला शाळेतील माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट या धड्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तर माकड अन् टोपीवाल्याच्या गोष्टीचं लेटेस्ट व्हर्जन असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही मृत्यूशीही लढू शकता…”साप आणि घोरपडीच्या खतरनाक फाईटचा VIDEO व्हायरल
या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत. नेटकरीही व्हिडीओवर गमतीशीर कमेंट करत आहेत. सोशल मीडियामुळे गल्ली-बोळात घडणाऱ्या गोष्टींपासून मोठ मोठ्या घटनांचे व्हिडीओ समोर येतात. रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.