Monkey video viral : जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडं मानवी वस्तीतही येतात. ते जेव्हा एकत्र असतात, तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. पण एखादं माकड चुकून मानववस्तीत आलं तर लोक त्याला त्रास देतात किंवा इजा करतात. काही लोक त्याला दगडंही मारण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे माकड जखमी होऊ शकते. पण सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पूर्णपणे वेगळाच आहे. तुम्हाला माहितीच आहे काही हातात दिसलं की ही माकडं लगेच ते हिसकावून घेतात आणि पळ काढतात. मात्र यामध्ये एका माकडाने चक्क एका वकिलाची २ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली आणि जवळच्या झाडावर चढला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल…

ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील कोर्टाच्या परिसरात घडून आली आहे. यावेळी एक वकील प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि स्टँम्प पेपर खरेदी करण्यासाठी आपल्यासोबत एक पैशांची बॅग घेऊन आला होता. सांगितलं जात आहे की, या बॅगेत तब्ब्ल २ लाख रुपयांची कॅश होती. वकील जेव्हा चेंबरच्या बाहेर उभा होता तेव्हा अचानक एक माकड त्याच्या जवळ आला आणि त्याने वकीलाच्या हातून ही पैशांची बॅग हिसकावून घेतली. वकील त्याला पकडेल याआधीच तो तिथून बॅग घेऊन फरार झाला आणि एका झाडावर चढून त्याने हवेतून नोटांचा वर्षाव केला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात झाडावरुन नोटांचा वर्षाव होताना दिसतो. यात काही लोक संधीचा फायदा घेत नोटा वेचून त्या आपल्या खिशात टाकतानाही दिसून येतात. मिळालेल्या माहितीनुसार, वकिलाने कोर्टातील काही परिचित लोकांना बोलावून हे सर्व पैसे वेचले ज्यात त्याला यश तर आले पण संपूर्ण नगद त्याच्या हाती आली नाही. वकीलाने एकूण १.९५ लाख रुपये लोकांच्या मदतीने जमा केले पण बाकी 5,000 रुपये मात्र त्याच्या हाती लागले नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स काऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.  विशेष म्हणजे, पर्यटन स्थळी अशा माकडांच्या दहशतीचे अनेक व्हिडिओ आहेत. गेल्या वर्षी एका लेण्यांना भेट देताना माकडाने केलेल्या हल्ल्याचा प्रसंग एका युजरने शेअर केला होता. “गुना गुहेत भयानक माकडाने आमच्यावर हल्ला केला. इथे येऊ नका. जर तुम्हाला माकडांनी हल्ला करावा असे वाटत असेल तर इथे या,” असे त्यांनी म्हटले आहे.