monkeys vs crocodile video: निसर्गात फक्त स्वतःचं जगणं महत्त्वाचं नसतं, तर एकमेकांशी असलेलं नातंसुद्धा तितकंच मोलाचं असतं, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. माणसांसारखंच प्राण्यांनाही मैत्री कळते, काळजी वाटते आणि वेळ आली तर ते आपल्या मैत्रीसाठी जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये माकडांनी दाखवलेली एकजूट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
व्हिडीओ ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील महाकालपाडा भागातला असल्याचं सांगितलं जात आहे. हा भाग खाऱ्या पाण्यातील भल्या मोठ्या मगरींच्या नावाने ओळखला जातो. अनेकदा या मगरी नदीकाठावर येणाऱ्या प्राण्यांवर हल्ला करतात. अशाच एक वेळी एक माकड अचानक मगरींच्या तावडीत सापडतंव्हिडीओमध्ये दिसतं की, एक माकड पाण्याच्या काठावर असताना अचानक मगर त्याच्यावर हल्ला करते.
पाहा व्हिडीओ
माकड मदतीसाठी ओरडताच आजूबाजूला असलेली इतर माकडं तिथे धावत येतात. क्षणाचाही विचार न करता काही माकडं थेट पाण्यात उडी मारतात. आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ते मगरीच्या दिशेने जातात.माकड आरडाओरड करत, पाण्यात हालचाल करून मगरीच लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. काही क्षणांसाठी वाटतं की कदाचित माकड आपल्या साथीदाराला वाचवतील.
पण, दुर्दैवाने मगर अधिक ताकदवान असल्याने सगळ्या प्रयत्नांनंतरही माकडांचा तो साथीदार वाचू शकत नाही.हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर भावनांच्या भरात लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. काही जण म्हणतायत, “माणसांनी तरी यांच्याकडून एकजूट शिकावी.” तर काहींनी लिहिलंय, “हे दृश्य दुःखद आहे, पण माकडांची हिंमत सलाम करण्यासारखी आहे.” अनेक युजर्सनी प्राण्यांमध्ये असलेली नि:स्वार्थ मैत्री आणि भावना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी तर हा व्हिडीओ पाहून डोळ्यांत पाणी आल्याचंही सांगितलं.
हा व्हिडीओ फक्त एक व्हायरल व्हिडीओ नाही, तर तो निसर्गातील भावनांचं वास्तव दाखवतो. प्राणीही आपल्या माणसांसाठी किंवा इथे आपल्या साथीदारांसाठी शेवटपर्यंत लढतात. कधी कधी ते आपल्याला माणुसकीचा अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने शिकवून जातात.आपल्याला आयुष्यातल्या छोट्या गोष्टींचा सन्मान कसा करावा हेही ते दाखवतात. त्यांच्या निसर्गाशी असलेल्या नात्याने आपलं हृदय मऊ होतं.”
