थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहूणे फ्लेमिंगो पक्षांचं तामिळनाडूच्या प्वाईंट कॅलिमेर पक्षी अभयारण्यात आगमन झालं आहे. आएएस महिला अधिकारी सुप्रिया साहू यांनी फ्लेमिंगोंचा सुंदर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तामिळनाडूतील नागापट्टीनम येथील या पक्षी अभयारण्यात ५० हजारांहून अधिक फ्लेमिंगो मुथूपेट्टाईच्या कांदळवनात दाखल झाले आहेत. परदेशात चहूबाजूला असलेल्या समुद्र किनाऱ्यांवरून भारतात दाखल झालेल्या फ्मेमिंगो पक्षांचं साहु यांनी स्वागत केलं आहे. फ्लेमिंगो पक्षांच्या थव्याच्या अप्रतिम व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडीओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.

फ्मेमिंगो पक्षांचा थव्याच्या मनमोहक व्हिडीओ झाला व्हायरल

चेन्नईपासून जवळपास ३७० किमी अंतरावर असलेल्या तामिळनाडूच्या नागापट्टीनममध्ये हजारे फ्मेमिंगो पक्षी गगनभरारी घेत आहेत. फ्मेमिंगो पक्षांचा थवा समुद्र किनाऱ्यावर फिरताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटर तुफान व्हायरल झाला असून २४ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसेच एक हजारहून अधिक जणांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. “हा व्हिडीओ खूप सुंदर आहे.” अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही दृष्य हृदयाला स्पर्ष करणारी आहेत.” फ्लेमिंगो पक्षांचा थव्याची दृष्य मन प्रसन्न करणारी आहेत,” असंही अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं.” पक्षांचा थवा उडतानाची दृष्य मनमोहक आहेत, ते पक्षी निसर्गाशी एकरुप आहेत, असंही एकाने म्हटलं.”

Sarabjit singh Khalsa
इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा?
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

इथे पाहा व्हिडीओ

flamingo birds

आएएस महिला अधिकारी सुप्रिया साहू सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तामिळनाडूच्या मुदूमलाई व्याघ्र प्रकल्पात प्राण्यांना कशाप्रकारे नाश्ता बनवला जातो, याचा व्हिडीओ साहू यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. काही हत्ती नाश्ता करण्यासाठी प्रतीक्षा करत असल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलं होतं. नाश्त्यासाठी धीर धरणारे हत्ती या व्हिडीओत दाखवण्यात आले आहेत. जेवण बनवणारे कर्मचारी कशाप्रकारे त्यांच्या नाश्त्याचं नियोजन करतात, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं होतं. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओला ५२ हजारांहून अधिक व्यूज मिळाले होते.