Most Expensive Vegetable In The World: जेव्हा तुम्ही भाजी मंडईत भाजी खरेदीसाठी जाता तेव्हा १०० ते २०० रुपये किलोपर्यंतची सर्वात महाग भाजी खरेदी करता. यापेक्षा महाग भाजी असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणंच पसंत करतात. लोक मशरूमसारख्या महागड्या भाज्या अधूनमधून बनवतात. जगात एक अशी भाजी आली आहे ज्याची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या भाजीचे नाव ‘हॉपशूट्स’ (Hopshoots) आहे, जी युरोपियन देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि तिला जगातील सर्वात महाग भाजी म्हटले जाते. महागडी भाजी असण्यामागचे कारण म्हणजे हॉपशूटमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

या महागड्या भाजीची किंमत सुमारे ८५,००० रुपये प्रति किलो आहे. ही भाजी भारतात घेतली जात नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमाचल प्रदेशच्या शेतात पहिल्यांदाच त्याची लागवड करण्यात आली. एका अहवालानुसार, हॉप शूट्स काढणीसाठी बैक-ब्रेकिंग (Back-Breaking) आहेत आणि हेच एकमेव कारण आहे की हॉप शूटची किंमत इतकी महाग आहे. हॉप शूटची किंमत त्यांच्या गुणवत्तेनुसार बदलते. महाग असण्याबरोबरच ही भाजी कोणत्याही बाजारात सहजासहजी मिळत नाही. हॉप-शूट ही भाजी इतकी महाग आहे की, त्याच किमतीत बाईक किंवा सोन्याचे दागिने खरेदी करता येतात.

Gukesh Youngest Ever To Win Candidates Tournament
लहानाचे मोठेपण..
Nagpur, Jyoti Amge, World's Shortest Woman, World's Shortest Woman voting, World's Shortest Woman in nagpur, lok sabha 2024, polling day, nagpur news, guinness book
जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेचे नागपुरात मतदान
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
What is the hottest place on earth
पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे? येथे माणूस राहू शकतो का? जाणून घ्या येथे किती आहे तापमान?

( हे ही वाचा: ऐ…ऐ माझी चप्पल सोड! महिलेने सापाला चप्पल मारताच साप ती चप्पलच घेऊन पळाला, पाहा Video)

या किंमतीत तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करू शकता

या महागड्या भाजीचे शास्त्रीय नाव Humulus lupulus असे असून ही बारमाही वनस्पती आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील मूळ रहिवाशांनी जगातील सर्वात महाग भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. ही भाजी मध्यम गतीने ६ मीटर पर्यंत वाढू शकते आणि २० वर्षांपर्यंत जगू शकते. गार्डियनमधील एका अहवालानुसार, हॉप शूट्स काढणीसाठी तयार होण्यासाठी तीन वर्षे लागतात. या रोपाची कापणी करण्यासाठी भरपूर शारीरिक श्रम करावे लागतात, कारण रोपाच्या छोट्या हिरव्या टिपा तोडताना खूप काळजी घ्यावी लागते.

( हे ही वाचा: Video: लग्नमंडपात मित्राने ‘ती’ चूक करताच नवऱ्याने त्याला चांगलंच चोपलं; नवरीने मध्यस्थी करताच तिलाही…)

शू हॉप्सचे आरोग्य फायदे काय आहेत?

वैद्यकीय अभ्यासानुसार, असे सुचवण्यात आले आहे की ही भाजी क्षयरोगाच्या विरूद्ध एंटीबॉडी तयार करू शकते आणि चिंता, निद्रानाश, अस्वस्थता, तणाव, लक्ष कमतरता-हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD), चिंताग्रस्तपणा आणि चिडचिड अशा समस्या असलेल्या लोकांना मदत करू शकते.