Shocking video: रेल्वे रुळ ओलांडू नका, दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याचा वापर करा. चालत्या लोकलमध्ये चढू, चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करु नका…अशा सूचना वारंवार देऊनही काहीजण ही चूक करतात आणि याचे गंभीर परिणाम त्यांनाच भोगावे लागतात. यामध्ये अनोकांचा अपघात होतो. तर अनेक जण जिवानीशी जातात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय.
मध्य प्रदेशात घडून आली आहे. महिला आपल्या लहान मुलासोबत धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करते आणि यातच ती सपशेल फेल होते. रेल्वेचा वेग जास्त असल्याने तिला रेल्वेत चढता येत नाही,ज्यामुळे ती आपल्या मुलासोबत रेल्वेच्या फटीत जाऊन पडते आणि वाईटरित्या चिरडली जाते.
ही घटना मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी रेल्वे स्थानकावर घडून आली.अगरतला इंटरसिटी एक्सप्रेस प्लॅटफार्म नंबर ४ वरुन सुटली होती. यादरम्यानच ३५ वर्षीय अंजली कश्यप आपल्या ३ वर्षांच्या मुलाला घेऊन चालू ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला रेल्वे सुरु झाल्यानंतर धावक पळत येऊन त्यात चढण्याचा प्रयत्न करते पण वेग जास्त झाल्याने ती रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मधोमध असलेल्या फटीतून खाली ट्रेनखाली पडते. ही घटना इतकी भीषण होती की, तिथे उपस्थित इतर प्रवासादेखील काही काळासाठी सुन्न होतात. कुणालही काय करावं ते समजत नाही. लोक मदतीचा प्रयत्न करतात खरं तोपर्यंत महिला रेल्वेखाली गेलेली असते.
पाहा व्हिडीओ
एवढा भयंकर अपघात पाहून तुम्हीही यापुढे रूळ ओलांडण्याआधी आणि चालत्या गाडीत चढण्याआधी १०० वेळा विचार कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.
