Viral video:पोलीस अधिकारी होण्याच स्वप्न प्रत्येकाचं असतं. यासाठी प्रत्येकजण कष्ट करत असतो, घरचेही यासाठी कष्ट करत असतात. कष्ट करुन मिळवलेल्या यशाचे समाधान जास्त असते, अशीच एक बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुलानं वर्दी घातल्यानंतर पहिल्यांदा आई-वडिलांना व्हिडीओ कॉल केला. यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तुमचेही डोळं पाणावतील.

आपल्या मुलाला किंवा मुलीला पोलिसांच्या वर्दीत पाहायचं अनेक आई-वडिलांचं स्वप्न असतं. अशाच आई-वडिलांच आपल्या लेकाला वर्दीत पाहायचं स्वप्न पूर्ण झालंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही व्हिडीओतील अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

Two Ladies and boy inside DTC bus over Seat issues shocking video
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; महिलांच्या भांडणामध्ये आलेल्या तरुणानं खाल्ला मार; VIDEO एकदा पाहाच
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Anand Hendre created a world cup scene for Ganeshotsav
असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
due to police promptness Bibwewadi Girls Missing for 24 Hours Found in Kalyan
बिबवेवाडीतून तीन शाळकरी मुली बेपत्ता; पोलिसांच्या तत्परतेमुळे शोध मुली कल्याणमध्ये सुखरुप सापडल्या
Boyfriend killed girlfriends four year old son after he vomits
उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाचा खून,नाशिकमधील आरोपी अटकेत; बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
A nine year old girl was sexually assaulted by her father in malad mumbai news
sexually assaulted case: नऊ वर्षांच्या मुलीवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
Who is Juli Vavilova, mystery woman present with Telegram CEO Pavel Durov during his arrest
टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव्हच्या अटकेदरम्यान त्यांच्याबरोबर असलेली गूढ महिला जुली वाविलोवा नक्की आहे तरी कोण?
Escaping with a girl met on Facebook Nagpur crime news
प्रेमविवाहानंतरही पतीचे विवाहित महिलेसोबत पलायन

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलीचं तोंडभरुन कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगा ड्युटीवर गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा वर्दी घालतो तेव्हा तो आई-वडिलांना व्हिडीओ कॉल करतो. यावेळी आई-वडिल आपल्या मुलाला वर्दीमध्ये पाहून खूप खूश होतात. त्यांच्या डोळ्यात समाधान आणि अश्रू पाहायला मिळत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मुलाला शेतकरी बनवायचंय का?” शेतकऱ्याला कमी लेखणाऱ्या मुख्यध्यापिकेवर टिकेची झोड

मायेच्या सावलीत लेकरांना लहानचं मोठ करायचं आणि मग जगाच्या खड्ड्यात त्याला पडताना पाहणं पालकांसाठी कठीण असतं. पण या खड्ड्यातून तो सुखरुप बाहेर येऊन त्याचं स्वप्न पूर्ण करतो तो क्षण आई वडिलांसाठी जगातील सर्वात अनमोल क्षण असतो. हा व्हिडीओ @mpsc_policebharti_guru या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे. १८ सेकंदांच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणलं.