Viral video: सोशल मीडियावर कायम अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी चिमुकल्यांचे शाळेतील डान्स तर कोणाचा लग्नाच्या वरातीमधील डान्स. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ एका लग्नातील आहे. त्या व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलीच्या आईनं भन्नाट डान्स केला आहे.
लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण… मुलींना परकं धन समजलं जातं. कारण- एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते. पण, आई-वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं. मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही. मुली नेहमीच आई-वडिलांची सेवा करताना दिसतात. जी पोरगी आयुष्यभर आई-बापाच्या कुशीत वाढली, जिला हवं ते मिळत होतं, ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते. दरम्यान अशाच एका नवरीच्या हौशी आईचा लेकीच्या लग्नातला डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात इतकी खूश आहे की तिला तिचा आनंद रोखून ठेवता आला नाही. जशी लेक जावयासोबत स्टेजवर येते तशी आई शीट्या वाजवत स्टेजवर नाचू लागते. यावेळी नवरा नवरीही ठेका धरत नाचताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ rajshree_gosavi_bridal_studioया इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आईचं धम्माल सेलिब्रेशन”. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हौशी आई” तर आणखी एका महिलेने “लेक लेक असते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.