Viral Video : आई ही व्यक्ती प्रत्येकासाठी खास असते. जन्म देणाऱ्या आईचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. ती निस्वार्थपणे आपल्या मुलांवर आयुष्यभर प्रेम करत असते. त्यांची काळजी घेत असते. जीवापाड त्यांना जपत असते. आई आणि मुलीचे नातेही असेच असते. लहानाची मोठी होऊन जेव्हा मुलगी आईवडीलांचे घर सोडते तेव्हा तिला आईची प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणी आठवण येते. आईचे महत्त्व कळते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला आईची आठवण येईल. सासरी गेलेल्या मुलीच्या डोळ्यांत कदाचित पाणी येईल. (emotional video viral)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आई स्वयंपाक करत आहे तर मुलगी तिच्या शेजारी ओट्यावर बसून गरमा गरम आईच्या हातचं जेवण करत आहे. दोघी एकमेकींबरोबर गप्पा मारताना सुद्धा दिसतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांना जुने दिवस आठवतील तर काही लोकांना माहेरची आठवण येईल. या व्हिडीओवर सुंदर ऑडीओ लावला आहे. या ऑडिओमध्ये भावूक करणारा मेसेज सांगितला आहे. मेसेज या प्रकारे – आईच्या समोर कसले ते आपले मोठेपण.. जसजसे आपण मोठे होतो, जग कळू लागते तसतशी आईच्या कुशीची जास्त आठवण येते हो. तो विसावा कुठेच नाही हो..” या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “किती मोठे झाले तरी आईसाठी आपण तिची लाडूबाईच. आई आहे म्हणून माहेर आहे”

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
a girl child student sleeping in class watch funny video goes viral will make you remember your school days or childhood
भर वर्गात चिमुकलीची झोप सुटेना! डुलकी घेता घेता शेवटी… पाहा मजेशीर VIDEO
Viral Video: Girl's Rain Dance Interrupted By Thunderbolt Scare shocking video
VIDEO: निसर्गापुढे माणूस दुबळाच! ‘ती’ रील्स बनवत होती आणि वीज पडली; तुम्हीच सांगा तरुणीचं काय चुकलं?
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
Person stuck in traffic got bored and ended up doing this video
एकीकडे ट्रॅफिक जाम दुसरीकडे वडिलांचे १५ मिस कॉल्स; तरुणानं केलं असं काही की VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा : उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदांचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील पाच सेकंदांचं दृश्य आहे भयंकर, कशी केली मृत्यूवर मात पाहाच

हेही वाचा : इजिप्त विमान अपघातात तब्बल १५०० प्रवाशांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड; पण VIDEO मागील सत्य काय?

neha_satpute2111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आईबरोबर नक्कीच शेयर करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं आहे हे. आई तुला खूप खूप प्रेम आणि तुझी खूप आठवण येते.” तर एका युजरने लिहिलेय, “अरे खूप भारी वाटतं .. आपण मोठे झालो, मुलं झाली तरी मम्मी कडे गेलो की तिच्या कुशीत हातावर झोपलो की सगळं काही ठीक आहे हे फिल होते…” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही.”