Elephant emotional video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मग ती आई कोणाचीही असो अगदी प्राण्यांचीही पण आईचं प्रेम हे बदलत नाही. नुकताच भारतीय वन सेवेतील अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही…
आपल्याच मुलांचा मृत्यू बघायचं दुर्भाग्य कोणत्याच आईच्या नशीबी येऊ नये असं वाटतं मात्र हेच दुर्भाग्य एका हत्तीणीच्या नशीबी आलंय. या आईचा व्हिडीओ पाहून तुमचंही हृदय हेलावेल, अश्रू रोखणे कठीण होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मादी हत्ती जी एक आई सुद्धा आहे, ती आपल्या मुलाच्या मृत्यूने इतकी दु:खी आहे की तिला ते स्वीकारणे अशक्य झालं आहे. ती आपल्या निर्जीव मुलाला वारंवार ओढताना दिसत आहे. या घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी सांगितले की ती अनेक दिवस तिच्या मुलासोबत राहिली आणि बाहेर जाण्यास नकार दिला. हे पाहून कुणालाही दुःख होईल. व्हिडिओ शेअर करणारे IFS अधिकारी कासवान यांनी लिहिले की, हत्तीची आई आपल्या मुलाचा मृत्यू स्वीकारु शकत नाही. पिल्लाच्या मृत्यूबाबत तिला विश्वास बसत नसल्याने काही काळ ती मृतदेह ओढत राहते.. हे प्राणी देखील आपल्यासारखेच आहेत कासवान पुढे म्हणाले की, हत्तींबाबत अशा प्रकारची भावनिक कृती दिसून आली आहे.
पाहा व्हिडीओ
मानवाप्रमाणे इतर प्राण्यांना भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाही असं म्हणतात. मात्र याला एक अपवाद आहे ते म्हणजे हत्ती. हत्ती मानवाप्रमाणेच आपल्या भावना व्यक्त करतात असं संशोधकांच म्हणणं आहे. याचचं जातं उदाहरण या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आले आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, यावेळी एकानं म्हंटलंय, आई ही आईच असते. तर आणखी एकानं म्हंटलंय, “कुठल्याच आईवर अशी वेळ येऊ नये देवा”