scorecardresearch

Premium

घर सोडून गेलेला मुलगा वर्दीत परतला, आईच्या अश्रूंचा बांध फुटला, भावनीक Video व्हायरल

Video: मायेच्या सावलीत मोठ लहानचं मोठ करायचं आणि मग जगाच्या खड्ड्यात त्याला पडताना पाहणं पालकांसाठी कठीण असतं. पण या खड्ड्यातून तो सुखरुप बाहेर येऊन त्याचं स्वप्न पूर्ण करतो तो क्षण आई वडिलांसाठी जगातील सर्वात अनमोल क्षण असतो.

Mother gets emotional seeing her son in Police uniform
घर सोडून गेलेला मुलगा पोलिसाच्या वर्दीत परतला

Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक आपणाला भावूक करणारा आणि आई-मुलाच्या नात्यातील निस्वार्थ प्रेम दाखवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही व्हिडीओतील आईसह मुलाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

मुलाला वर्दीत पाहण्यासारखं सुख नाही

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, आई घर कामात व्यस्त असताना तिला दरवाजावर आवाज येतो. कोणतीही कल्पना नसताना लेकाचा आवाज ऐकून आई दार उघडते आणि डोळ्यासमोर पोलीस वर्दीत लेकाला पाहून तिचा आनंद गगणात मावत नाही. मुलाला पोलिसांच्या वर्दीत पाहून माऊली डोक्याला हात लावते. तिच्या डोळ्यांवर तिला विश्वास बसत नाही. त्यानंतर त्याला घट्ट मिठी मारते, यावेळी तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक आईसाठी लेकाचा यश हे जगातील सर्वात मोठं सुख आणि अनमोल क्षण असतो.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: माय-लेकाची ५ वर्षांनी झाली भेट, आईला पाहताच लेकानं थेट खांद्यावर घेतलं उचलून

हृदयाला भिडणारा आणि भावनिक असा एक आई मुलाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे.  १८ सेकंदांच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2023 at 18:25 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×