Crow and Eagle Fight Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय, जो पाहून नेटिझन्स हादरलेत. हा फक्त एक पक्ष्यांचा संघर्ष नाही, तर ती आईच्या प्रेमाची आणि पिलांच्या रक्षणासाठी धडपडण्याची जिवंत कहाणी आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की एका घरट्यात गरुड आपल्या लहानग्या पिलांसोबत राहत असतो. पण अचानकच एका भुकेल्या कावळ्याची नजर त्या चिमुकल्यांवर पडते आणि सुरू होतो एक रक्तरंजित संघर्ष. जाणून घ्या नेमकं काय घडतं…

कावळ्याचा हल्ला: निष्पाप पिलांवर जीवघेणा प्रसंग

घरट्यात शांतपणे बसलेल्या गरुडाच्या पिलांवर कावळा अचानक हल्ला करतो. एक पिल्लू त्याच्या चोचीच्या प्रहारांनी रक्तबंबाळ होतं. त्या पिलाचे पंख तो चोचीद्वारे फाडतो. कावळा निर्दयपणे त्याच्यावर एकामागोमाग एक आघात करतो आणि शेवटी त्याची पिसं तो आपल्या चोचीत घेऊन उडून जातो.

आई गरुडाचं आगमन: राग, वेदना व प्रतिशोध

काही वेळात त्या पिलांची आई परत येते. ती पाहते तेव्हा तिच्या चिमुकल्या पिलाची रक्तबंबाळ अवस्था अन् थरथरणाऱ्या पिलांचे ते भीषण अवस्थेचे दृश्य पाहून, त्या आईचं काळीज हेलावतं. तिच्या हृदयविदारक दु:खदायी किंकाळ्यांनी आकाशही हादरतं.

आईचा प्रतिशोध: न्याय एका क्षणात

पिलांना जखमी करणाऱ्याच्या प्रतिशोधात असलेल्या त्या मातेला आकाशात एक कावळा उडताना दिसतो. आपल्या पिलाला रक्तबंबाळ करणारा शिकारी कावळा तोच असल्याची खात्री त्या सूडाग्नीने पेटलेल्या मातेला पटते. मग काय एकही क्षण न दवडता, ती कावळ्याच्या दिशेने वायुवेगाने झेप घेते. तो कावळा पलायनाचा प्रयत्न करतो; पण गरुडाच्या तावडीतून एखादा पक्षी सुटणे म्हणजे केवळ अशक्यप्राय बाब. ती माता त्याला आकाशातच पकडते आणि थेट जमिनीवर आपटते. तिथेच ती गरुडमाई कावळ्यावर तडाखेबाज हल्ले करते. त्याचेही पंख फाडते, चोचीचे इतके जबरदस्त आघात त्याच्यावर करते की, त्या कावळ्याची हालचालही करू शकत नाही अशी निष्प्राण अवस्था होते.

येथे पाहा व्हिडीओ

व्हिडीओनं जिंकली लोकांची मनं

हा संपूर्ण प्रसंग सोशल मीडियावर एक रील व्हिडीओ म्हणून व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला “आई म्हणजे काय असते याचं ज्वलंत उदाहरण”, असं म्हणत कमेंट्स करीत आहेत. अनेकांनी लिहिलंय, “आई कुणाचीही असो, ती आपल्या लेकरांसाठी आगीतही उडी घेईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थरारून जाल… एक आई आणि तिच्या लेकरांचं हे नातं पाहून कोणलाही वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतील.