Mother-in-law dance: लग्न समारंभात नवरी आणि नवरदेव सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात, पण सध्या सोशल मीडियावर एका लग्नाची चर्चा फक्त आणि फक्त नवरीच्या आईमुळे, म्हणजेच नवरदेवाच्या सासूमुळे रंगली आहे. नवरदेवाच्या स्वागतासाठी सासूबाईंनी असा काही डान्स केला की, नवरदेवाची रिअॅक्शनही तु्म्ही पाहाच . त्यांच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोक भरभरून त्यावर कमेंट्स करत आहेत. सासूबाईंची ही एनर्जी आणि उत्साही स्वभाव पाहून अनेक नेटकऱ्यांनी ‘अशी सासू सगळ्यांना मिळायला हवी,’ असे म्हटले आहे.
सासूबाईंनी स्टेजवर पाऊल ठेवताच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, जबरदस्त ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले एक्सप्रेशन्स पाहून वऱ्हाडी मंडळी आणि पाहुणे सतत टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवत होते. विशेष म्हणजे, नवरदेवालाही सासूबाईंचा हा डान्स पाहून अश्रू अनावर झाले आहेत. तर आपल्या मुलाप्रती एवढा आदर पाहून नवरदेवाकडील लोकांनाही खूप आनंद झाला आणि तेही या क्षणाचा मनमुराद आनंद लुटताना दिसले.
मिथिला का कण कण खिला जमाई राजा राम मिला…या गाण्यावर डान्स करत खरतंर नवरदेवाचं कौतुकच याठिकाणी डान्सच्या माध्यमातून सासूबाईंनी केलं आहे. त्यामुळे हे पाहून नवरदेवही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @sampada_2201 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ ऑनलाईन येताच लोकांनी तो मोठ्या प्रमाणावर शेअर करायला सुरुवात केली. या व्हिडिओवर आलेल्या कमेंट्समध्ये लोक सासूबाईंच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत. एका युजरने ‘सासूबाईंचा डान्स मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारा आहे’ असे म्हटले, तर दुसऱ्याने ‘या नवरदेवाचे नशीब खरंच फळफळले आहे’ असे लिहिले. अनेक लोकांनी सासूबाईंच्या या मोकळ्या आणि आनंदी स्वभावाची प्रशंसा केली आहे आणि ‘लग्न समारंभातील हा सर्वात खास क्षण होता’ असेही म्हटले आहे.
