Shocking video: जगातील सर्वात मुल्यवान आणि अनोखी गोष्ट असेल तर ती आपली आई…कोणत्याही मानसिक संकटात असो किंवा आर्थिक गोष्टीत नेहमी आपल्या बाजूने उभी राहते ती आई… आपल्या लेकरांसाठी कोणत्याही संकटाला सामोरं जाण्यांची ताकद फक्त आईमध्ये असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. ‘माय असे उन्हातील सावली, माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल, यावीत आता दु:खे खुशाल’ अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली, तर सैतानालाही धूळ चाखवू शकते. याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे.

असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे.एक मुलगी आपल्या आईसोबत समुद्राच्या किनाऱ्यावर बसली होती.तेवढ्यात भल्यामोठ्या लाटा आल्या आणि या आई-लेकीला सोबत घेऊन गेल्या. दरम्यान आईला किनाऱ्यावर येण्याची संधी मिळाली पण तिची मुलगी मात्र पाण्यात वाहून जात होती. मग शेवटी आईनं आपल्या मुलीचे प्राण कसे वाचवले हे आता तुम्हीच पाहा.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी एक महिला आणि तिची मुलगी खडकावर बसलेल्या दिसत आहे. किनाऱ्यावर बसलेल्या माय-लेकी असलेली हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं त्या खूप पुढे जातात. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर त्यांचा टिकाव लागत नाही. आणि त्या दोघीही लाटेसोबत समुद्रात खेचल्या जातात. त्या दोघी उठण्याचा प्रयत्न करतात तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि आत खेचते. दरम्यान आईला बाहेर पडण्याची संधी मिळाली होती. पण आपली मुलगी पाण्यात वाहून जातेय हे लक्षात येताच आई पुन्हा एकदा लाटेसोबत समुद्रात गेली आणि मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागली. नशीब बलवत्तर म्हणून अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर दोघींना वाचवण्यात यश येतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.

Story img Loader