एक आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते याचा प्रत्यय आपण नेहमी पाहत आलो आहे. मग तो माणूस असो वा प्राणी. आपल्या मुलांची काळजी करताना, त्यांचा जीव वाचवताना, त्यांच्यावर प्रेम करतानाचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत आपण सोशल मीडिवर पाहिले आहेत. जगातील प्रत्येक आई आपल्या मुलावर खूप प्रेम करत असते. आई अशी असते जी आपल्या मुलावर आलेले संकट स्वत:वर घेते. सोशल मीडियावर सध्या एका अशा आईचा जुना व्हिडीओ सध्या नव्याने व्हायरल होत आहे. यामध्ये ट्रकखाली चिरडण्यापासून आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई स्वतःचा जीव संकटात टाकते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे.

ही घटना व्हिएतनाममधील आहे. या घटनेच्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून जाताना दिसत आहे. त्यानंतर एक कार त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करते आणि यादरम्यान कार त्यांच्या दुचाकीला धडकते. मागे बसलेले आई व मुलगा दोघेही दुचाकीवरून रस्त्यावर पडतात. तितक्यात समोरून एक भरधाव ट्रक येतं आणि…. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहावा लागेल. हे दृश्य खरोखरंच अंगावर शहारे आणणारं आहे.

आणखी वाचा : फक्त माणूसच नाही तर प्राणीसुद्धा एकमेकांची मदत करतात, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : OMG! जेव्हा कांगारू थेट बारमध्ये पोहोचला…, VIRAL VIDEO पाहून नेटिझन्सकडून कमेंट्सचा महापूर

ट्रकमधून पडूनही आई आपल्या मुलाला वाचवते. तिने एका हाताने मुलाला ट्रकखाली येण्याआधीच बाजुला केले आणि वाचवले. यात आई सुद्धा सुखरूप निघाली. तिने आपला जीव धोक्यात घालून मुलाला वाचवलं खरं तर नशीब बलवत्तर म्हणून तिच्याही जीवाला कोणता धोका पोहोचला नाही. हे सर्व फक्त १२ सेकंदात घडलं. हा व्हिडीओ तसा जुना आहे. परंतू आता तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर नव्याने व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांनी आईचे कौतुक केले. अगदी एका व्यक्तीने तिला ‘मदर ऑफ द इयर’ म्हटलं होतं. ‘हा काय चमत्कार होता’ असे भाव लोकांकडून व्यक्त होत आहेत. या महिलेच्या झटपट प्रसंगावधनाने अनेकांना आश्चर्य वाटलंय.