video: ‘नाच मेरी रानी’ गाण्यावरचा मायलेकाचा व्हिडीओ व्हायरल; नोरा फतेहीलाही लाजवेल असा भन्नाट डान्स

व्हायरल व्हिडीओमध्ये आई-मुलाची जोडी ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर स्टेप-टू-स्टेप डान्स करताना दिसत आहे.

व्हिडीओला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Photo : Video Screen Grab / lohi_ravi / Instagram )

गायक गुरू रंधावा आणि नोरा फतेही यांच्या ‘नाच मेरी रानी’ या गाण्यावर आई-मुलाची जोडी इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आई-मुलाचा डान्स इतका जबरदस्त आहे की खुद्द नोरा फतेहीही ते पाहून मंत्रमुग्ध होईल. व्हिडीओमध्ये दोघांचाही उत्साह पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमध्ये फक्त मुलगाच नाही तर आईही जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

आई-मुलाच्या जोडीने इंटरनेटवर घातला धुमाकूळ

व्हायरल व्हिडीओमध्ये आई-मुलाची जोडी ‘नाच मेरी रानी’ गाण्यावर स्टेप-टू-स्टेप डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूपच जबरदस्त आहे. सोशल मीडिया यूजर्सही मायलेकाच्या या जोडीला प्रचंड पसंती देत ​​आहेत. हा व्हिडीओ आईने तिच्या lohi_ravi इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत ११ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळा शर्ट घातलेला मुलगा व हिरवी साडी परिधान करून आईसोबत जबरदस्त डान्स करत आहे. साडीमध्ये आई करत असलेला डान्स पाहून लोकांचे मन खदखदत आहे. या दोघांनी याआधीही अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. आईचा फिटनेस पाहून तुम्हालाही वाटणार नाही की एकत्र नाचणारा तरुण तिचा मुलगा आहे.

जेव्हा-जेव्हा नोरा फतेही हिचे गाणी येतात तेव्हा ते सोशल मीडियावर कव्हर केले जाते. लोकं तिच्या गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ बनवतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतेच आलेले तिचे ‘नाच मेरी रानी’ हे गाणेही खूप धमाल करत आहे. या गाण्यावर लोकं जोरदार रील्स बनवत आहेत आणि सोशल मीडियावर या गाण्याच्या अनेक डान्स व्हिडीओंचा बोलबाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother son duo dance on nach meri rani song nora fatehi will also be fascinated after seeing scsm

Next Story
एवढ्या लहान वयातही ही मुलगी करतेय इतका ड्रामा; व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी