Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. आपल्याला माहिती आहे, आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात.आपल्यापैकी अनेकांचे एकच ध्येय असते ते म्हणजे, आपल्या आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करणे. कारण आपल्याला लहानाचे मोठं करण्यासाठी त्यांनी स्वत:च्या सुखाचा त्याग केलेला असतो. त्यामुळे आई-वडिलांची स्वप्न पुर्ण करणं हे मुलांचे कर्तव्य असतं. शिवाय अनेक मुलं देखील आपल्या पालकांच्या कष्टाचं चीज करतात आणि त्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपला पहिला पगार लेकानं आईच्या हातात दिला आहे. हा भावनीक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, मुलगा आपल्या आई-वडिलांना डोळे मिटायला सांगतो आणि त्यांच्यासमोर पैशांचे बंडल ठेवतो. त्यांची प्रतिक्रिया तात्काळ आणि हृदयस्पर्शी होती. त्याचे वडील थक्क झालेले दिसत होते, तर त्याची आई नुकतेच काय घडले हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना स्पष्टपणे भावूक दिसत होती. “मी आज जो काही आहे, तो सर्व त्यांच्यामुळेच आहे,” असे कांबळेने व्हिडिओ ऑनलाइन शेअर करताना लिहिले. क्लिपमध्ये दिसणाऱ्या एका संदेशात लिहिले होते, “आयआयएमनंतरचा माझा पहिला पगार माझ्या आई-वडिलांना देत आहे.” हा हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी भावूक झाले असून ते व्हिडीओतील मुलाचं तोंडभरुन कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. आई-वडिलांनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.
