scorecardresearch

Video : पोहता यावं म्हणून आईने गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकलं अन् घडलं…

बाळाला पोहता येण्यासाठी आईने भन्नाट शक्कली लढवली, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

Mother throws baby in swimming pool
आईने बाळाला स्विमिंग पुलमध्ये फेकलं अन्…(Image-Twitter)

Child In Swimming Pool Viral Video : इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करणारे असतात, तर काही व्हिडीओ पाहून लोकांचा थरकाप उडतो. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. एक महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्वमिंग पूलमध्ये फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आपल्या बाळाला पाण्यात पोहता यावं, यासाठी तिने बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. महिलेनं तिच्या बाळाला पाण्यात का फेकलं? असा प्रश्न अनेकांना पडला असेलचं. पण व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल.

एक महिला तिच्या लहान मुलाला स्विमिंग शिकवण्यासाठी पुलाच्या बाहेरून त्या मुलाल थेट पाण्यात फेकत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर ती महिलाही पाण्यात जाते आणि मुलाला हातांनी इशारा करून बाहेर बोलवण्याचं प्रयत्न करते. पाण्यात गेल्यानंतर लहान मुलगाही पोहण्यासाठी धडपड करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर ती महिला मुलाल प्रेमाने जवळ घेते. मुलाल पाण्यात फेकल्यानंतर सुरुवातीला असं वाटतं की, हा मुलगा पाण्यात बुडेल. पण काही क्षणातच मुलगा पाण्यात पोहण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.

नक्की वाचा – Viral Video : रील बनवण्यासाठी जिवंत मगरीच्या जबड्यात हात टाकला अन् काही सेकंदातच डाव पलटला

इथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @perspectivewow नावाच्या युजरने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, महिला स्विमिंग इंस्ट्रक्टर आहे. पाण्यात पोहता यावं म्हणून त्या महिलेनं बाळाला पाण्यात फेकलं. या व्हिडीओला आतापर्यंत १.८ मिलियन व्यूज मिळाले आहेत. तर १८ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लहान मुलगा पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लाखो नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 14:14 IST